मिर्झापूर-२ मधील ‘हे’ आहेत जबरदस्त डायलॉग!

Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन   

मोस्ट अवेटेड वेब सीरीज 'मिर्जापूर-२'ने डिजिटल प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला आहे. मिर्जापूर-१ प्रमाणेच मिर्जापूर -२ मध्येही वेब सीरीजच्या सर्व भूमिका दमदार दिसत आहेत. पहिल्या भागातील डायलॉग्ज फेमस बनले होते. त्याप्रकारे दुसऱ्या भागामध्येही असे अनेक डायलॉग्ज आहेत, जे फॅन्सना खूप आवडत आहेत. 

'मिर्जापूर-२' चे अनेक डायलॉग्स रिलीज होताच सोशल मीडियावर याची चर्चा रंगली या डायलॉग्जमुळे मिर्जापूरने धमाल उडवून दिली आहे. हे आहेत 'मिर्जापूर-२' चे बेस्ट डायलॉग्ज…

– कुछ लोग बाहुबली पैदा होते हैं और कुछ को बनाना पडता है, इनको बाहुबली बनाएंगे

– बातें ज्यादा हुई नहीं, बस आहट लेकर आ गए

– शादीशुदा मर्द को अपनी स्त्री से भय न हो तो इसका मतलब है कि शादी में कुछ गडबड है

-जब कुर्बानी देने का टाइम आए तो सिपाही की दी जाती है. राजा और राजकुमार जिंदा रहते हैं गद्दी पर बैठने के लिए

– औरत चाहे चंबल की हो या पूर्वांचल की, जब गन उठाई है तो इसका मतलब है कि दिक्कत में है

-दिखाते समय कॉन्फिडेंस हो तो पब्लिक पूछती नहीं कि फाइल में क्या है

– शर्मा से क्या शर्माना, दिस इज ए कॉमन डिजीज

– नेता जी बनना है तो गुंडे पालों, गुंडे मत बनो

– हमारा उद्देश्य एक है… जान से मारेंगे… क्योंकि मारेंगे तभी जी पाएंगे

मिर्जापूर-२ ओटीटी प्लॅटफॉर्म निश्चित तारखेच्या आधी रिलीज करण्यात आली आहे. ही वेब सीरीज २३ ऑक्टोबरला रिलीज होणार होती. परंतु, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने ही वेब सीरीज तीन तासांपूर्वी रिलीज करण्यात आली. अॅमेझॉन प्राईमवर ही सीरीज २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता रिलीज करण्यात आली. 

'मिर्जापूर २' मिहिर देसाई आणि गुरमीत सिंह यांनी दिग्दर्शित केली आहे. यामध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्‍येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी, राजेश तैलंग, श्रिया पिळगावकर, रसिका दुग्गल, लिलीपुट, कुलभूषण खरबंदा यासारख्या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी या सीरीजची निर्मिती केली आहे. तुम्ही पाहिला का हा मिर्जापूर -२? तुम्हाला ही वेब सीरीज कशी वाटली? कोणते डायलॉग आवडले, कळवा.  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news