

Mi Savitribai Jyotirao Phule serial
मुंबई: जगदंब क्रिएशन निर्मित आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका पुढील पंधरा दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मालिकेचे निर्माते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका सूचक पोस्टमुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.
“मालिका संपतेय… पण गोष्ट सुरूच राहणार,” असे अमोल कोल्हे यांनी पोस्टमध्ये लिहीलं आहे. मात्र, मालिका अचानक थांबवण्यामागचे नेमके कारण त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे मालिकेचा कमी टीआरपी, कथानकाची मर्यादित व्याप्ती की अन्य काही कारण, याबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच मालिका मध्यावरच संपुष्टात येणार असल्याच्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये नाराजी आणि उत्सुकता दोन्ही दिसून येत आहेत. आता याबाबत निर्मिती संस्थेकडून किंवा वाहिनीकडून अधिकृत भूमिका काय येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सावित्रीबाईंच्या संघर्षमय जीवनावर आधारित या मालिकेत स्त्री शिक्षणाची लढाई, जोतीराव फुले यांच्याोबतचा प्रवास आणि सामाजिक क्रांतीचा इतिहास दाखवला जात आहे. सावित्रीबाईंची भूमिका मधुराणी गोखले-प्रभुलकर यांनी साकारली आहे, तर डॉ. अमोल कोल्हे जोतीबा फुले यांच्या भूमिकेत आहेत. अमोल कोल्हेंच्या जगदंब क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केलीय.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेल व चित्रकर्मी पॅनेल या दोन प्रमुख पॅनेलमध्ये थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. 3 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित 14 जागांसाठी आता 44 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मावळते अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी ‘समर्थ पॅनेल’ आणि माजी संचालक सतीश रणदिवे यांनी ‘चित्रकर्मी पॅनेल’. घोषित केले आहेत. दोन्ही पॅनेलचे प्रत्येकी 14 उमेदवार निवडणूक लढवत असून, 16 अपक्ष उमेदवारांनीही मैदानात उडी घेतल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. शुक्रवारी गायन समाज देवल क्लबच्या भांडारकर सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी रागिणी खडके यांच्या उपस्थितीत चिन्हांचे वाटप करण्यात आले. समर्थ पॅनेलला ‘पतंग’, तर चित्रकर्मी पॅनेलला ‘कपबशी’ हे चिन्ह देण्यात आले. उर्वरित अपक्ष उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार आणि उपलब्धतेनुसार चिन्हांचे वाटप केले. या निवडणुकीकडे आता ‘कोल्हापूर विरुद्ध पुणे-मुंबई’ असा राजकीय आणि प्रादेशिक रंग चढू लागला आहे.