पुढारी ऑनलाईन डेस्क - दिग्गज तेलुगु सुपरस्टार चिरंजीवीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले. बॉलीवूड अभिनेता आमिर खानने मेगास्टारला हा पुरस्कार प्रदान केला आणि आपल्या भाषणामध्ये चिरंजीवीचे कौतुकदेखील केले. चिरंजीवीला हा सन्मान ४५ वर्षांच्या आपल्या कारकीर्दीतील १५६ चित्रपट आणि ५३७ गाण्यांमध्ये २४ हजार डान्स मुव्ह्ज केल्यानंतर मिळाला.
मेगास्टार चिरंजीवीला २२ सप्टेंबर रोजी अधिकृतपणे हा सन्मान मिळाला असून फोटो व्हायरल होत आहेत. भारतीय सिनेमाच्या इतिहासात ही तारीख सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जाईल. २२ सप्टेंबर यासाठी महत्वपूर्ण आहे की, त्याच दिवशी साऊथ सुपरस्टार चिरंजीवीने १९७८ मध्ये भारतीय चित्रपट इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. मागील ४५ वर्षांमध्ये चिरंजीवीने १५६ चित्रपटांसाठी ५३७ गाण्यांमध्ये २४ हजार डान्स स्टेप्स केले आहेत.
दरम्यान, हा सन्मान अभिनेत्याला दुसरे कुणी नाही तर सुपरस्टार आमिर खानने दिलं आहे.
२२ सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये आमिर खानने चिरंजीवीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा सन्मान देत कौतुक केले. बॉलीवुड सुपरस्टार आमिर खानने चिरंजीवाला आलिंगन दिलं. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कार्यक्रमात आमिर म्हणाला, 'इथे येणं माझ्यासाठी खूप आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. चिरंजीवी यांना सन्मान मिळाला, मी त्यासाठी खुश आहे आणि मलादेखील आपल्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी सर्वांचे धन्यवाद...'
बॉलीवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने पुढे सांगितलं, 'मी त्यांना आपल्या मोठ्या भावाप्रमाणे पाहतो. जेव्हा चिरंजीवी गारूने मला फोन केला आणि मला या कार्यक्रमात आमंत्रित केलं, तेव्हा मला समजले नाही की, त्यांनी मला का बोलावलं होतं.' मला खूप आनंद आहे की, चिरंजीवी गारू यांना हा सन्मान दिला गेला आहे..'