पुढारी ऑनलाईन डेस्क : मेधा शंकर (12th फेल) हिला IMDb 'ब्रेकआउट' स्टारमीटर पुरस्कार मिळाला आहे. मेधा शंकरने विधू विनोदचा चित्रपट १२वी फेलमध्ये काम केले आहे. हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी यांच्या खऱ्या जीवनावर आधारित आहे. (Medha Shankar ) चित्रपट स्ट्रीमिंगद्वारे रीलीज झाल्यानंतर शंकरला जानेवारीमध्ये प्रसिद्ध भारतीय सेलिब्रिटीजच्या टॉप 10 यादीत तीन वेळेस स्थान मिळाले व दोन आठवडे ती पहिल्या स्थानावर होती. १२ वी फेल सध्या सर्वोच्च २५० भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानी आहे व त्याचे IMDb युजर रेटींग ९.१ आहे. मेधा शंकरने आधी दिल बेकरार, मॅक्स, मिन, आणि मेओवझाकी आणि शादीस्थानमध्ये काम केले आहे. (Medha Shankar )
मेधा शंकर म्हणाली, "IMDb 'ब्रेकआउट स्टार' स्टारमीटर पुरस्कार मिळाल्याचा मला अतिशय आनंद होत आहे, ही अतिशय विशेष बाब आहे व IMDb ह्या मूव्हीजवरील सर्वांत विश्वसनीय स्रोताकडून हे मिळाल्याचा वेगळा आनंद आहे," "श्रोत्यांचे प्रेम माझ्यासाठी सर्वांत मोठे आहे आणि मला ह्या भुमिकेला इतके प्रेम दिल्याबद्दल मला माझ्या चाहत्यांना धन्यवाद द्यायचे आहेत."