Matthew Perry Death : 'Friends' फेम मॅथ्यू पेरीच्या मृत्यूप्रकरणी जॅसवीनला १५ वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा

Matthew Perry Death
Matthew Perry Death pudhari
Published on
Updated on

Matthew Perry Death : लॉस एन्जल्समधील फेडरल जजने बुधवारी फ्रेंड्स टीव्ही शो मधील कलाकार मॅथ्यू पेरीच्या मृत्यूप्रकरणी ४२ वर्षाच्या महिलेला १५ वर्षाचा तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याबबत जज शेरलीन गार्नेट यांनी जॅसवीला सांगितलं की तुम्हाला आता मोठा कणखरपणा दाखवावा लागणार आहे.

Matthew Perry Death
custodial death case | सत्यमेव जयते! महिला कॉन्‍स्‍टेबलचे धाडस...कोठडीतील हत्या प्रकरणी ९ पोलिसांना फाशीची शिक्षा कशी झाली?

सरकारी वकीलांनी केटामाईन क्वीन म्हणून ओळख असलेल्या जॅसवीनाला कडक शिक्षा व्हावी यासाठी युक्तीवाद केला होता. त्यांच्या मते केटमाईन वितरण साखळीतील जॅसवीना ही मुख्य व्यक्ती आहे. न्यायालयाने त्यांचा हा युक्तीवाद मान्य करत जॅसवीना यांनी शिक्षा ठोठावली.

मॅथ्यू पेरी यांनी प्रसिद्ध टीव्ही शो फ्रेंड्समध्ये चँड्लर बिंगची भूमिका साकारली होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये ते लॉस एन्जल्समधील त्यांच्या घरात मृत आढळून आले होते. वैद्यकीय अहवालात त्यांच्या मृत्यूला कॅटामाईन हे ड्रग्ज प्रामुख्यानं जबाबदार आहे असं आढळून आलं होत.

Matthew Perry Death
Beed Crime | पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेप; कुऱ्हाडीने वार करून केली होती हत्या

नंतर तपासात असं आढळून आलं की पेरी हे डिप्रेशनवरील केटमाईन हे ड्रग बेकायदेशीररित्या घेत होते. त्यांनी वैद्यकीय चॅनलशिवाय दुसऱ्या ठिकाणावरून देखील हे औषध मिळवलं होतं. यात डॉक्टरांसह काही व्यक्ती आणि मध्यस्थांचा देखील समावेश होता. दरम्यान, जॅसवीना यांच्याकडून पेरी यांनी ड्रग्ज कॅशमध्ये विकल्याचं आढळून आलं आहे.

मॅथ्यूचे वडील काय म्हणाले?

सुनावणीदरम्यान, पेरीचे सावत्र वडील किथ मॉरिसन यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, 'त्याच्याकडे जो स्पार्क होता तो मी कोणाकडे पाहिला नव्हता. त्याने अजून काम करायला पाहिजे होतं.' ते पुढे म्हणाले की पेरीचे कुटुंबीय प्रत्येक दिवशी दुःखाचा आणि वेदनेचा सामना करतात.'

Matthew Perry Death
Satarda ZP School | शिक्षक नसल्याने सीमाभागातील शाळा 'ओस'! सातार्डा, आरोंदा भागातील मुले शिक्षणासाठी गोव्याच्या वाटेवर

जॅसवीनासोबतच इतरांनाही मिळाली शिक्षा

दरम्यान, जॅसवीनाचे वकील मार्क यांनी सांगितलं त्यांनी सरकारी वकीलांच्या युक्तीवादाचा विरोध केला. पेरीच्या निधनाला व्यसन जबाबदार आहे माझा अशिल पूर्णपणे जबाबदार नाही. ते म्हणाले की, पेरी यांनी जे काही केलं ते करण्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नव्हतं.

याचबरोबर त्यांनी केटामाईन क्वीन असा जो टॅग त्यांच्या अशिलाला लावण्यात आला आहे त्याच्यावर देखील टीका केली. या केसमध्ये पाच आरोपी आपला बचाव करत होते. या लोकांनी केटामाईनच्या सप्लाय चेनमध्ये विविध भूमिका राबवली होती. यात डॉक्टर ज्यांनी बेकायदेशीरपणे पेरी यांना केटामाईन विकलं त्यांना अडीच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली. दुसऱ्या एका आरोपीला आठ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे.

पेरी यांचे पर्सनल असिस्टंट आणि मित्र जो हे ड्रग मिळवण्यात मध्यस्थाची भूमिका निभावत होता त्याला अजून शिक्षा सुनावण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news