पुढारी ऑनलाईन डेस्क - ग्लोबल सेन्सेशन नोरा फतेही तिच्या आगामी 'मटका' चित्रपटासाठी सक्रियपणे शूटिंग करत आहे. ऑनलाइन समोर आलेल्या काही BTS फोटो मध्ये एक पांढरी फुलांची साडी नेसली आहे. पारंपरिक साडीत नोरा दिसतेय. फोटीमध्ये ती तिचा सहकलाकार वरुण तेज आणि क्रू मेंबर्ससोबत दिसत आहे. फोटो समोर आल्यापासून, तिचे चाहते चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल अधिक तपशीलांची आतुरतेने वाट पाहत आहेत.
यापूर्वी हैदराबादमध्ये शूट शेड्यूल दरम्यान नोराला पायाला गंभीर दुखापत झाली होती आणि डॉक्टरांनी तिला दोन महिने बरे आराम करण्याचा सल्ला दिला होता. दुखापतीतही, ती सध्या ‘मटका’ चित्रपटाच्या दुसऱ्या शूटिंग शेड्यूलसाठी शूटिंग करत आहे. ती आयफा २०२४ मध्ये सलग तिसऱ्यांदा परफॉर्म करताना दिसणार आहे. फिफा 'लाइट द स्काय' आणि 'पेपेटा' या गाण्यांसाठी जागतिक स्तरावर ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.