Lakhat Ek Aamacha Dada | गावकऱ्यांकडून सूर्याचा बहिष्कार! तुळजा परत मिळवणार का सूर्याचा सन्मान?

Lakhat Ek Aamacha Dada | तुळजा परत मिळवणार का सूर्याचा सन्मान? 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत नवं ट्विस्ट येणार आहे.
image of Lakhat Ek Aamacha Dada tv serial cast
'लाखात एक आमचा दादा' मालिकेत नवं ट्विस्ट येणार आहे. Instagram
Published on
Updated on

TV Serial Lakhat Ek Aamacha Dada new twist

मुंबई : 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत दादाची आई, आशा घराबाहेर राहायला लागते आणि काजू-पुड्या तिच्यासोबत राहतात. दुसऱ्या दिवशी गावकरी सूर्याच्या घरा बाहेर जमा होतात आणि आशाला गावाबाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पण सूर्या त्यांना इशारा देतो आणि आईचं रक्षण करतो. तर जलिंदर सूर्याच्या बाजूने असल्याचे भासवून गुपचूप लोकांना भडकवतो की सूर्या आणि त्याच्या कुटुंबाचा बहिष्कार करावा. लोक सूर्याच्या दुकानातून सामान घेणे थांबवतात, दूध, वर्तमानपत्र घेणही थांबवतात.

सूर्याला आता गावकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. हे सर्व पाहून आशा गाव सोडण्याचा निर्णय घेते, पण तुळजा तिला थांबवते. तर दुसरीकडे मंजुळा आणि तेजू यांची अचानक भेट होते आणि दोघी चांगल्या मैत्रिणी बनतात. मात्र, दोघीही एकमेकांशी आपली वैयक्तिक माहिती शेअर करत नाहीत. सूर्या ज्यांच्याकडून भाजीपाला आणि इतर माल दुकानासाठी खरेदी असतो त्यांची तिची मुलगी नदीत बुडते. एकही गावकरी तिच्या मदतीस पोहचत नाही, तेव्हा सूर्या स्वतः नदीत उडी मारून त्या मुलीचा जीव वाचवतो. तेव्हा तुळजा सर्व गावकऱ्यांना सांगते की, ज्या व्यक्तीला तुम्ही वाळीत टाकलं होतं, त्यानेच आज या मुलीचा जीव वाचवला आहे.

image of Lakhat Ek Aamacha Dada tv serial cast
Shikhar Dhawan-Jacqueline Besos Teaser | 'बेसोस' गाण्यातून हिट ठरणार शिखर धवन-जॅकलीनची जोडी, टीजर रिलीज

आता सूर्याच्या या कृत्याने गावकरी सूर्याला परत मान देतील का? आशा, गाव सोडून जाऊ शकेल? 'लाखात एक आमचा दादा' रोज संध्या ६:३० वा. झी मराठीवर पाहा.

image of Lakhat Ek Aamacha Dada tv serial cast
Savalyachi Janu Savali| भैरवीला कोणी केले ब्लॅकमेल !

video -zeemarathiofficial Instagram वरून साभार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news