सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर पंधरा वर्षांनी येणार एकत्र

Marathi Movie | ‘बोल बोल राणी’ ७ फेब्रुवारीला होणार प्रदर्शित
Marathi Movie |
सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर पंधरा वर्षांनी येणार एकत्रpudhari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर अशी तगडी स्टारकास्ट लवकरच प्रेक्षकांना पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. 'बोल बोल राणी' ७ फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर हे सुमारे पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. सिड विंचुरकर दिग्दर्शित या चित्रपटाचे अपूर्वा मोतीवाले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली निर्माते आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणतात, '' मराठी चित्रपट आता जगभरात पोहोचत आहे. मुळात मराठी भाषेत उत्तमोत्तम विषय हाताळले जात असल्याने ते जगभरातील प्रेक्षकांना भावतात. मी स्वतः परदेशात असताना मराठी चित्रपट आवर्जून बघायचो. मुळात मराठी भाषेला समृद्ध साहित्याचा वारसा लाभला आहे. त्यामुळे या चित्रपटांमध्ये वैविध्य जाणवते. चित्रपट निर्मिती करणे हे माझे पॅशन आहे आणि म्हणूनच मी भारतात आलो. मी माझा पहिला चित्रपट हा मराठीच करणार, हे ठरवलेच होते. लवकरच 'बोल बोल राणी' प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यात या चित्रपटात तीन मोठे कलाकार एकत्र झळकणार आहेत. मी खूप उत्सुक हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येण्यासाठी.''

माझ्या कौशल्याचा कस लागणारी ही भूमिका आहे आणि ही भूमिका साकारताना मला खूप मजा आली. काही गोष्टी खूप आव्हानात्मक होत्या. परंतु खूप छान टीम एकत्र आल्याने आम्ही ही आव्हाने उत्तमरित्या पेलली. अपूर्वा आणि मी 'दुनियादारी'पासून एकत्र आहोत आणि ती एक उत्तम एडिटर आहे. हा तिचा निर्माती म्हणून पहिला चित्रपट आहे. तिने अशाच अनेक चित्रपटांची निर्मिती करावी, असे मला वाटते. सिडबरोबर मी पहिल्यांदाच काम करतेय. भविष्यातही त्याच्यासोबत काम करेन, अशी आशा आहे. कारण मला त्याच्या कामाची पद्धत विशेष आवडली आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर

सुबोध भावे म्हणाला, अपूर्वाचे निर्मिती क्षेत्रात आणि सिडचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण होत आहे. या दोघांनीही ज्या पद्धतीचा विषय निवडला आहे, तो अत्यंत धाडसी विषय आहे. गेली दोन-तीन वर्षं या चित्रपटावर काम सुरू आहे. त्यामुळे अनेक गोष्टी खूप स्पष्ट होत्या आणि म्हणूनच चित्रीकरणात नेमकेपणा होता.

चिन्मय मांडलेकर सांगतो- 'मी नुकतंच 'बोल बोल राणी' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलंय. बऱ्याच वर्षांनी सुबोध, सई आणि मी एकत्र काम केलं. आमची चांगलीच भट्टी जमली आहे. थोडा वेगळ्या धाटणीचा हा सिनेमा आहे. सिडबरोबर मी पहिल्यांदाच काम करत आहे. तर अपूर्वाला मी ओळखतो परंतु निर्माती म्हणून मी तिच्याबरोबर पहिल्यांदाच काम करतोय. दोघांसोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news