Marathi Movie OTT | एप्रिलमध्ये मराठी ओटीटीवर रंगणार धमाकेदार एन्टरटेन्मेन्ट

एप्रिलमध्ये मराठी ओटीटीवर रंगणार धमाकेदार एन्टरटेन्मेन्ट
Marathi Movie OTT
एप्रिलमध्ये मराठी ओटीटीवर रंगणार धमाकेदार एन्टरटेन्मेन्टInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर सुपरहिट मराठी सिनेमे, दमदार वेब सिरीज आणि मराठी डब साऊथ ब्लॉकबस्टर चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहेत.

आम्ही बटरफ्लाय : चार मित्रांच्या स्वप्नांचा अनोखा प्रवास

'आम्ही बटरफ्लाय' हा चित्रपट चार जिवलग मित्रांच्या नात्यावर आधारित आहे. अनिकेत लिमजे आणि श्रीकुमार शिरस यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे. शिवा, रणजी, शाहरुख आणि रामन या १२ वर्षांपासून सोबत असलेल्या मित्रांच्या बालपणापासून तारुण्यापर्यंतच्या प्रवासाची ही कहाणी आहे. ११ एप्रिलला पाहता येणार आहे.

गरुडान : न्यायाच्या जाळ्यात अडकलेलं 'सत्य'

त्याचबरोबर, 'गरुडान' हा मल्याळम भाषेतील ब्लॉकबस्टर ॲक्शन-ड्रामा देखील आता मराठीत उपलब्ध होणार आहे. हा चित्रपट प्रामाणिक पोलीस हरीश माधव आणि प्राध्यापक निशांत यांच्या आयुष्याभोवती फिरतो. अनपेक्षितपणे एका गुन्ह्यात अडकलेल्या या दोघांपैकी हरीशला आपली निष्ठावान प्रतिमा जपायची असते, तर निशांतला न्याय मिळवायचा असतो. हे दोन्ही सुपरहिट चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी तुमच्या भेटीला येत आहेत.

आश्रय : त्याग आणि मातृत्वाची कहाणी

'आश्रय' हा मराठी चित्रपट आहे, ज्यामध्ये एका दत्तक घेतलेल्या मुलीची हृदयस्पर्शी कथा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'संतोष कापसे' यांनी केले असून या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर १८ एप्रिल २०२५ ला होणार आहे. हि कहाणी आहे तिची जी कचऱ्यात टाकलेल्या लहान बाळाला दत्तक घेते, मातृत्वाचे प्रेम देते आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले जीवन धोक्यात घालते.

कोडाई डायरीज - एक भयाण सत्य : रहस्य, अपहरण आणि पोलिसांचा संघर्ष

एक तमिळ भाषेतील क्राईम वेब सिरीज आहे, ज्याचे दिग्दर्शन राजेश एम. सेल्वा यांनी कुमार यांनी केले असून हि सिरीज २५ एप्रिल २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे. एका मोठ्या राजकीय नेत्याचं अपहरण आणि त्यातच शहरातल्या श्रीमंत घरातील पुरुष अचानक गायब होत आहेत. या दोन्ही गोष्टींचा तपास करण्यासाठी म्हणून रॉबर्ट वासुदेवन नावाच्या एका हुशार पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक झालेली असते. आता प्रश्न असा आहे, की तो या गुन्ह्यांचा छडा लावू शकेल का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news