मराठी कलाकारांनी शेअर केल्या प्रजासत्ताक दिनाच्या खास आठवणी

क्षमा देशपांडे  - प्रदीप घुले
क्षमा देशपांडे - प्रदीप घुले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रजासत्ताक दिवस साजरा करण्याशी संबंधित काही खास आठवणी सौ. प्रताप मानसी सुपेकर फेम प्रदीप घुलेने शेअर केल्या. तो म्हणतो- माझ्या प्रजासत्ताक दिनाच्या लहानपणीच्या शाळा आणि कॉलेजमधल्या खूप साऱ्या आठवणी आहेत. आम्ही सर्वजण सकाळी ७ वाजता शाळेत जायचो. पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रध्वज उभारला जायचा आणि आपल्या देशाच्या संविधानाचा आदर करत भारताचे राष्ट्रगीत गायचो.

संबंधित बातम्या –

आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे शाळेमध्ये आयोजन केले जायचे. प्रजासत्ताक दिवस हा आपल्या देशासाठी उत्साहाचा आणि अभिमानाचा आहे ! या दिवसासाठी प्रदीप धुलेची कास तयारी असायची. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी, तिरंगा ध्वज आदि संकल्पनांचा कल्पक वापर करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जायच्या, असे तो म्हणतो.

प्रदीप घुले म्हणतो-मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांना आवाहन करू इच्छितो की, प्रत्येकाने देशाभिमान आपल्या मनात आणि परस्परांमधील ऐक्य टिकून धरलं पाहिजे! जय हिंद!

जोगेश्वरीचा पती भैरवनाथ फेम क्षमा देशपांडे हिनेदेखील या खास दिनाबद्दल आपल्या आठवणी शेअर केल्या. ती म्हणते- लहानपणापासून मला नृत्याची आवड आहे. त्यामुळे दर वर्षी २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट ला ठरलेलं असायचं की माझा परफॉर्मन्स असेलच आणि त्यासाठीची जवाबदारी माझ्या शिक्षिका माझ्यावर सोपवायच्या. मग सगळ्यांची प्रॅक्टिस घेणं, कधी कधी कोरिओग्राफ करणं, कॉस्टूम कसे असले पाहिजे, प्रॉपर्टी काय असली पाहिजे, अश्या अनेक जवाबदाऱ्या माझ्यावर असायच्या. त्यासोबतच मी शाळेच्या गाण्याच्या ग्रुपमध्ये सुद्धा होते. त्यामुळे आलटून पालटून कधी नृत्य तर कधी गायन करायचे. दहावीत असताना मी परेडमध्ये सहभागी झाले आणि माझ्या बटालियनची मी कॅप्टनही होते. त्यामुळे खूप अभिमानाने त्या परेडला लीड केलं. आजही तो क्षण माझ्या लक्षात आहे.

शाळेतून कॉलेजला गेल्यावर ही मी नियमित ध्वजवंदन साठी शाळेत जायचे. ते ही अगदी पारंपरिक पोशाखात. सगळ्यांना भेटायचे आणि एकदा मला प्रमुख पाहुणी म्हणून देखील बोलावलेलं. शाळेत जाण्याची वेगळी उत्सुकता असते, अजूनही आहे. ह्यावर्षी मी मिस करेन.
ती पुढे म्हणते-अगदीच दरवर्षी सलग जमतं असं नाही. पण मी नक्कीच नाशिक च्या निरामय केअर सेंटर ला भेट देते. ती जागा माझ्या खूप जवळची आहे. त्या केअर सेंटरच्या डॉक्टर योगेश सदगीर यांनी माझ्या बाबांच्या पॅरालिसीसचा उपचार केला होता. त्यामुळे तिथे असणारे रुग्ण, कायम स्वरूपी आजारपणामुळे राहणारे काही आजी आजोबा यांना मी भेट देते आणि जमल्यास सगळ्यांसाठी नृत्याचे कार्यक्रम करते माझ्या काही मित्र-मैत्रिणी सोबत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news