

पुढारी ऑनलाईन डेस्क - हेमल इंगळेच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे. हेमलने काही व्हिडिओज आणि फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या घरी मुहूर्तमेढ संपन्न झाल्याचे दिसते. तिने आई-वडिलांसोबत काही फोटोज देखील शेअर केलेले दिसताहेत. तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून मोठी कॅप्शनदेखील लिहिली आहे.
''ही या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. भगवान गणेशाने मला नेहमीच मार्ग दाखवला आहे आणि मला खात्री आहे की, तो नेहमीच उत्तम करेल. माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी हा खूप भावनिक काळ आहे. 'बिदाई'च्या वेळी लोक कसे रडतात आणि अश्रू कशासाठी हे मला आज समजले आहे. हे इतके सोपे नाही. स्त्रीला आयुष्य घडवायचे असते आणि ती शेवटची कल्पना आणि विचार ठेवते तेव्हा ती पूर्णपणे नवीन प्रवास सुरू करण्यासाठी त्यास मागे सोडा. या नवीन अध्यायासाठी उत्सुक आहे, त्यासाठी घाबरलो आहे पण एक कुटुंब आहे जे माझे प्रेमाने आणि प्रेमाने स्वागत करत आहे ..आयुष्यात जे काही मिळायला हवं ते सहज मिळत नाही ...❤️''
हेमल इंगळेने यावेळी निळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यावर हिरव्या कलरचे ब्लाऊज घातले होते. दागिने आणि तिचा चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. पुजेच्या वेळचे व्हिडिओदेखील सोशल मीडियावर दिसत आहेत.