

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'भारत कुमार' नावाने प्रसिद्ध असलेले हिंदी चित्रपट अभिनेते मनोज कुमार यांनी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. मनोज कुमार यांचे वय अधिक होते. त्यांच्या परिवाराकडून हेल्थ इश्यूवर आतापर्यंत कोणतेही अधिकृतरित्या स्टेटमेंट आलेले नाही. वृद्धावस्थेशी संबंधित आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांचे निधन झाले.
मनोज कुमार यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान देशभक्ती चित्रपटांसाठी त्यांना भारत कुमार नावाने ओळखले जायचे. भारतीय चित्रपटांना नवी दिशा देणारे मनोज कुमार यांनी १९६० आणि ७० च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले. चित्रपट विश्वातील योगदानासाठी त्यांना २०१९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं. क्रांति चित्रपटातील गाणे आजदेखील बहरदार आहे.
मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीत अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून त्यांचे अमूल्य योगदान आहे. ‘शहीद’, ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘क्रांति’ यासारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी देशभक्तीची भावना प्रस्तुत केली.
'शहिद' चित्रपटातील 'ऐ वतन ऐ वतन' हे देशभक्तीपर गाणे तुम्हाला नक्कीच आवडेल.
'क्रांति' चित्रपटातील 'अब के बरस तुझे धरती की रानी' हे गाणे प्रचंड गाजले.
'शहीद' चित्रपटातील गाणे 'सरफरोशी की तमन्ना' ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील.
'दुल्हन चली ओ पहन चली' हे देखील क्रांती चित्रपटाल गाणे सदाबहार आहे.
आज देखील स्वातंत्र्यदिनी 'भारत का रहनेवाला हू' गाणे वाजवले जाते.
'मेरे देश की धरती' या गाण्याची ताल, सूर, लय, आवाज मनाला स्पर्शून जाणारी आहे.