manjiri fadnis : मंजिरीने जागवल्या आजीच्या आठवणी, प्रिय आजी…

मंजिरीने जागवल्या आजीच्या आठवणी, प्रिय आजी…
manjiri fadnis
manjiri fadnis

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या आजी-आजोबांसोबत वेळ घालवणे कुणाला आवडत नाही ? अभिनेत्री मंजिरी फडणीसने आपल्या आजीविषयीचे प्रेम एका खास पोस्टमधून व्यक्त केले आहे. अभिनेत्री मंजिरी फडणीस आपल्या पोस्टमध्ये म्हणते, 'ही' व्यक्ती आहे माझ्या आयुष्यातली खरी प्रेरणा आहे.

आजी-आजोबा बिनशर्त प्रेम करतात. आयुष्यभर या आठवणी प्रेमाने जपून ठेवल्या जातात. आजी-आजोबा आणि नातवंडांमधले नाते अगदीच जगावेगळे असते. आपल्या प्रिय आजीसाठीचं प्रेम व्यक्त करताना अभिनेत्री मंजिरी फडणीसने म्हटलं आहे, की तिची आजी तिच्यासाठी एक सच्ची प्रेरणा आहे. भारतीय सोशल मीडिया मंच 'कू'वर एक पोस्ट करत मंजिरीने लिहिलं, "ती ऑल इंडिया रेडिओमध्ये एक गायिकापण होती. आपल्या काळातली ती एकदम सुपर कूल लेडी होती. ती ८९/९० वर्षाच्या वयातही नियमित पोहायची, जिमला जायची. ती खूपच गोड व्यक्ती आहे. ती माझ्यासाठी सर्वात प्रेरक महिलांपैकी एक आहे.❤️"

दरम्यान, शेजाऱ्याच्या घरातील क्युट पपीसोबतचा व्हीडिओही नुकताच मंजिरीने 'कू'वर पोस्ट केला आहे. या पपीचे नाव बटर आहे. तो मला माझ्या परीची आठवण करून देतो, आता ती हयात नाही. पण सतत मी तिला मिस करते असे मंजिरीने म्हटले आहे.

तिने फालतू (२००६), जाने तू या जाने ना (२००८), ग्रँड मस्ती (२०१३), किस किसको प्यार करूँ (२०१५) आणि ख़ामख़ा (२०१६) मध्ये अभिनय केला आहे. मंजिरी एक अभिनेत्री आणि मॉडेलही आहे. तिचा जन्म मुंबईचा आहे. तिने हिंद, तेलुगू, मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

तिने रोक सके तो रोक लो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या बंगाली चित्रपट फालतूमध्ये तिने अभिनय केला होता. तिच्या हिंदी चित्रपटांसोबत तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही ती य़शस्वी झाली. तिच्या इतर यशस्वी चित्रपटांमध्ये मुंबई सालसा, निदोष, ग्रँड मस्ती, बरोट हाऊस, वॉर्निंग या चित्रपटांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news