

पुढारी ऑनलाईन डेस्क - ममता कुलकर्णी यांनी १९९१ मध्ये 'नानबरगल' या तमिळ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. १९९१ मध्येच त्यांचा पहिला हिंदी चित्रपट 'मेरा दिल तेरे लिए' प्रदर्शित झाला. ममता १९९३ मध्ये स्टारडस्ट मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट केल्यावर वादात सापडल्या होत्या. ड्रग्ज माफियाशी लग्न... अंडरवर्ल्ड कनेक्शन अशा अनेकविविध गोष्टींमुळे ममता कुलकर्णी वादग्रस्त होत्या. (Mamta Kulkarni)
ममता कुलकर्णी यांनी महाकुंभमेळ्यात संन्यास घेतला. किन्नर आखाड्यामध्ये त्यांना महामंडलेश्वर पद देण्यात आले. आध्यात्मिक जीवन स्वीकारण्यासाठी आणि महामंडलेश्वर बनण्यासाठी आधी दीक्षा घ्यावी लागते.
जेव्हा ममता यांनी चित्रपट इंडस्ट्री सोडली होती. तेव्हा त्यांच्यावर अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे आरोप होते. १९९३ मध्ये एका मॅगझीनसाठी टॉपलेस फोटोशूट केलं होतं. त्यावेळीही त्या चर्चेत आल्या होत्या.
२०१३ मध्ये ममता कुलकर्णी यांनी हिंदी चित्रपट इंडस्ट्री सोडून ड्रग माफिया विक्की गोस्वामीशी दुबईत लग्न केल्याचे म्हटले जात होते. विक्कीला दुबईमध्ये ड्रग्ज तस्करी करण्य़ासाठी १२ वर्षांचा तुरुंगवास झाला होता.
केनयातील एका हॉटेलमध्ये या तस्करीचा कट रचण्यात आला आणि मीटिंगसाठी ममता कुलकर्णी उपस्थितीत होत्या, असे दोषारोप पत्रात म्हटले होते. ममता कुलकर्णी, विकी गोस्वामी आणि मनोज जैन या दोषींसोबत मीटिंगला हजर होत्या, असा त्यांच्यावर आरोप होता. या प्रकरणात नंतर बऱ्याच जणांना अटक झाली, तसेच एक किलो इफिड्रेन पावडर जप्त करण्यात आले होते. यामध्ये पुरवणी दोषारोप दाखल करून ममता कुलकर्णींनाही आरोपी बनवण्यात आले होते.
मागील वर्षी अखेर २५ वर्षांनी ममता कुलकर्णी मुंबईत परतल्या होत्या. ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांचे करिअरच संपून गेले होते. ममता २५ वर्षे परदेशात राहिल्या. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या खासगी आयुष्यावर भाष्य केले. ममता म्हणाल्या, विकी गोस्वामीसोबत मी लग्न केलेले नाही. त्यामुळे तो माझा पती नाही. मी अविवाहित आहे. मी कोणाशीच लग्न केलेले नाही. विकी आणि मी नात्यात होतो; पण मी त्याला ४ वर्षापूर्वी ब्लॉक केले आहे. विकी चांगला माणूस आहे.