

पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलिवूडची माजी अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना किन्नर आखाड्याचे संस्थापक अजेय दास यांनी आखाड्यातून बाहेर केले असल्याची माहिती समोर आलीय.
प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ दरम्यान किन्नर आखाड्याने ही कारवाई केली. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनीी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवून आखाड्यातून बाहेर केलं आहे. तसेच लक्ष्मी नारायण त्रिपाठीला आचार्य महामंडलेश्वर पदावरून आणि आखाड्यातून बाहेर करण्यात आलं.
ममताने प्रयागराजमध्येच महाकुंभ मेळ्यात संन्यास घेण्याची घोषणा केली होती. ममताने महाकुंभ दरम्यान किन्नर आखाड्यात आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठीची भेट घेतली होती. त्यानंतर ममताने संगमवर पिंडदान विधी केली होती. तिचा राज्याभिषेक किन्नर आखाड्यात झाला होता. महाकुंभमध्ये संन्यास घेतल्यानंतर ममता कुलकर्णीला नवे नाव 'श्री यमई ममता नंद गिरी' देण्यात आले होते. तसेच तिला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदी नियुक्त केलं होतं.