मलायका-माधुरी दीक्षितची मराठमोळी अदा

malaika arora
malaika arora

पुढारी ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडच्या तारका 'मलायका अरोरा' आणि धक धक गर्ल 'माधुरी दीक्षित' यांनी झी मराठी अवॉर्ड्स म्हणजेच नात्यांचा महाउत्सवात हजेरी लावली. माधुरी आणि मलायका या दोघीही या घरच्या उत्सवात अगदी मराठमोळया अंदाजात सहभागी झाल्या. मलायकाचं कोळी नृत्य हे या कार्यक्रमाचं खास आकर्षण ठरलं.

एवढचचं नाही तर श्रेया बुगडेकडून बेसनाचे लाडू बनवायला शिकून मलायका हे खास लाडू सारेगामा लिटिल चॅम्प्सचे परीक्षक सलील कुलकर्णींना देणार आहेत. माधुरी दीक्षितनेही सर्व नायिकांसोबत मंगळागौर साजरी केली. सोबत रंगली ती माधुरी, भाऊ कदम आणि भुवनेश्वरीची हास्याची जुगलबंदी.


हे सर्व धमाकेदार परफॉर्मन्स पाहण्याची प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता लागली असेल. तेव्हा शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी मलायका-माधुरीचा हा परफॉर्मन्स पाहता येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news