

लोकगीत आणि भक्तिगीत गायिका मैथिली ठाकूर चांगलीच लोकप्रिय आहे. आता ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा जोर धरते आहे. याबाबत मैथिलीने पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा तिने यावेळी ना या बातम्यांचे खंडन केले ना त्यावर काही प्रतिक्रिया दिली. (Latest entertainment News)
25 वर्षीय गायिका मैथिलीने भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रभारी विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
त्यामुळे मैथिली दरभंगा येथून आगामी निवडणुकीसाठी तिकीट मिळणार का या चर्चानी जोर पकडला आहे.
विनोद तावडे यांनी रविवारी आपल्या सोशल मीडिया हॅंड्लवरुन एक पोस्ट शेयर केली होती. 1995 मध्ये बिहारमध्ये लालू यांचे सरकार सत्तेत आल्यावर जे कुटुंब बिहार सोडून गेले होते. त्या कुटुंबाची लेक मैथिली ठाकूर बदलत्या बिहारला पाहून पुन्हा एकदा तिथे येण्याची इच्छा बाळगून आहे.’
मैथिली आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘मी हे सगळे टेलिव्हिजनवर पहात आहे. अलीकडेच मी बिहारला गेले होते. मला नित्यानंद राय आणि विनोद तावडे यांची भेट घेण्याची संधी मिळाली. आम्ही बिहारच्या भवितव्यावर चर्चा केली. आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेल्या नाहीत. पाहू काय होते? मी माझ्या गावाच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यात उत्सुक आहे. कारण माझा ओढा तिकडे आहे.’
अर्थात तिच्या या पोस्टवरुन हे तर स्पष्ट झाले आहे की बिहार निवडणुकीपूर्वी अनेक कलाकार बीजेपीमध्ये प्रवेश करू शकतात. अर्थात मैथिलीच्या एकंदरीत संकेतांवरून ती पक्षप्रवेश लवकरच करू शकते.
बिहारच्या मधूबनी जिल्ह्यातील बेनीपट्टीची मूळ रहिवासी असलेल्या मैथिली ला निवडणूक आयोगाने बिहारच्या स्टेट आयकॉन म्हणून गौरवले होते. भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोक संगीताची यशस्वी गायिका आणि बिहारी लोकपरंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी 2021 मध्ये तिला उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.