पुढारी ऑनलाईन डेस्क - सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅट्ट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतच आहे. नवनवीन गोष्टी आपल्याला या सीजनमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. त्यातील एक सरप्राईस येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी नुकतीच महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर उपस्थिती लावली. फक्त हजेरीच नाही लावली तर महेश मांजरेकर यांनी हास्यजत्राचे मंच देखील गाजवला.
चक्क महेश मांजरेकर महाराष्ट्राची हास्यजत्राचा मंचावर प्रहसन करताना दिसणार आहेत. देवमाणूस या चित्रपटासाठी महेश मांजरेकर आणि चित्रपटाची संपूर्ण टीम महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर येणार आहेत आणि हास्यजत्रेचा आनंद घेणार आहेत.
विशेष म्हणजे महेश मांजरेकर या विशेष भागात एक संपूर्ण प्रहसन करणार आहेत. हास्यमहारथी समीर चौघुले, अभिनेत्री चेतना भट, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, अभिनेता रोहित माने आणि मंदार मांडवकर या कलाकारांसोबत ते आपल्याला दिसणार आहेत. शूटिंग शूटिंग असे या प्रहसनाचे नाव असून धमाकेदार असे प्रहसन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या आधी देखील महेश मांजरेकर हास्यजत्रेतील प्रहसनाचा भाग झाले होते. या प्रहसनामध्ये महेश मांजरेकर हास्यविरांसोबत मंचावर चक्क क्रिकेट खेळताना आपल्याला दिसणार आहेत.
एपिसोड पाहण्यासाठी महाराष्ट्राची हास्यजत्राचा हा विशेष भाग पाहा..बुधवारी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर.