

Mahavatar Cinematic Universe announced Vishnu Avatars Films
मुंबई - होम्बले फिल्म्स आणि क्लीम प्रोडक्शन्स यांनी अॅनिमेटेड फ्रँचायझी – महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्सची अधिकृत घोषणा केली आहे. भारताच्या प्राचीन अध्यात्मिक परंपरेवर आधारित ही अॅनिमेटेड मालिका भगवान विष्णूंच्या दशावतारांवर केंद्रित असेल. पुढील एक दशकभर ही चित्रपटमालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची सुरुवात महावतार नरसिंह या चित्रपटाने २०२५ मध्ये होणार आहे आणि समाप्ती महावतार कल्कि – भाग २ या चित्रपटाने २०३७ मध्ये होईल.
★ महावतार नरसिंह – २०२५
★ महावतार परशुराम– २०२७
★ महावतार रघुनंदन– २०२९
★ महावतार द्वारकाधीश– २०३१
★ महावतार गोकुलानंद – २०३३
★ महावतार कल्कि – भाग १ – २०३५
★ महावतार कल्कि – भाग २ – २०३७
महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्स केवळ चित्रपटांपुरते मर्यादित न राहता – कॉमिक्स, डिजिटल कथा, व्हिडीओ गेम्स आणि विशेष संग्रहणीय वस्तूंच्या माध्यमातून विविध प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध करून देण्यात येईल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल आणि आपली परंपरा नव्या पद्धतीने सादर करेल.
‘महावतार नरसिंह’ या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विन कुमार करत आहेत. क्लीम प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली शिल्पा धवन, कुशल देसाई आणि चैतन्य देसाई हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट ५ भारतीय भाषांमध्ये आणि ३D फॉरमॅटमध्ये प्रदर्शित होईल. ‘महावतार नरसिंह’ ही केवळ एक फिल्म नाही, तर ती आजच्या पिढीला आपल्या प्राचीन संस्कृतीशी जोडणारी एक जिवंत अनुभूती असेल. या चित्रपटाचे प्रदर्शन २५ जुलै २०२५ ला होईल.