महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण

महाराष्ट्र शाहीर
महाराष्ट्र शाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाहीर साबळे यांच्या जीवनावर तयार होत असलेल्या 'महाराष्ट्र शाहीर ' या चित्रपटाच्या मोशन पोस्टर चे बुधवारी अनावरण केले. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

शाहीर साबळे यांनी गायलेल्या आणि अजरामर ठरलेल्या जय जय महाराष्ट्र माझा…. या गीताला नुकताच राज्यगीताचा दर्जा देत असल्याचे जाहीर केले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, " शाहीर साबळे यांचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्वाचा वाटा आहे. हा इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून अधोरेखित होणार आहे. हा एक ऐतिहासिक ठेवा ठरणार आहे आणि त्यामुळे ही चित्रपटनिर्मिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा."

महाराष्ट्र शाहीर
महाराष्ट्र शाहीर

वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या छोटेखानी समारंभाला चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे, निर्माते संजय छाब्रिया, बेला केदार शिंदे, अंकुश चौधरी उपस्थित होते. कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

'महाराष्ट्र शाहीर'ची प्रस्तुती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची आहे. चित्रपटाचे निर्माते आहेत संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे. चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आहे. लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. शाहिरांच्या प्रमुख भूमिकेत अंकुश चौधरी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाहिरांचा नातू केदार शिंदे याने केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news