

मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही सावित्रीबाईंच्या संघर्षमय जीवनावर आधारित नवी मालिका लवकरच प्रदर्शित होणार आहे. स्त्री शिक्षणाची लढाई, जोतीराव फुले यांच्याोबतचा प्रवास आणि सामाजिक क्रांतीचा इतिहास या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
मुंबई - ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अरुंधती देशमुख भूमिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री अरुंधती गोखले प्रभुलकर आता नव्या भूमिकेतून समोर येतेय. एक टीव्ही मालिका असणार आहे, ज्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहे तर डॉ. अमोल कोल्हे जोतीबा फुले यांच्या भूमिकेत दिसतील. अमोल कोल्हेंच्या जगदंब क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केलीय.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेणारी मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिका येणार भेटीला येणार आहे.
काय म्हणाली मधुराणी गोखले?
‘सावित्रीबाई फुले युगस्त्री होत्या. असं व्यक्तिमत्त्व साकारायला मिळणं ही खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. आज आपण मुक्तपणे शिकत आहोत, हव्या त्या क्षेत्रात आपण काम करत आहोत, अभिमानाने मिरवत आहोत. पण त्यासाठी दीडशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने इतका मोठा संघर्ष केला. उत्सुकता तर आहेच शिवाय हुरहूर आणि दडपणही आहे.’
महात्मा जोतीराव फुले यांची व्यक्तिरेखा साकारणं आव्हानात्मक आहे. मी या मालिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं समाजाप्रती जे योगदान आहे ते शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. आज उंबरठ्याबाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा जर कुणी असतील तर त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत.’
- डॉ. अमोल कोल्हे, अभिनेते
कधी पाहता येणार नवी मालिका?
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेणारी नवी मालिका 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ५ जानेवारीपासून पाहता येणार आहे.