apsara movie
apsara movie

एक अनोखी प्रेमकथा “अप्सरा” चित्रपटाचा टीजर लॉन्च

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : एक अनोखी प्रेमकथा असलेल्या अप्सरा या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला. प्रेमकथेला सुरेल संगीताची जोड देण्यात आली आहे. अनुभवी आणि नव्या दमाच्या कलाकारांचा दमदार अभिनय या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या १० मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सुनील भालेराव यांच्या 'श्रमण फिल्म्स' या निर्मिती संस्थेतर्फे "अप्सरा" चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे.
चित्रपटातील तीन गाणी मंगेश कांगणे यांनी केली आहेत.

या तिन्हीही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले आहे. गायक अभय जोधपूरकर गायिका आनंदी जोशी, ओंकार स्वरुप, भैय्या मोरे, मेघा मुसळे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

सुयश झूंजुरके, मयूरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, मेघा घाडगे, शशांक शेंडे, विट्ठल काळे, विजय निकम, मयूर पवार, राजेश भोसले, आशिष वारंग,समीक्षा भालेराव, प्रज्ञा त्रिभुवन, संघर्ष भालेराव आदी कलाकारांच्या या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी कॅमेरामन, निलेश राठोड संकलन तर सुबोध आरेकर, इमरान मालगुणकर,कृतिक माज़िरे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.

एका तरुणाच्या मनातल असलेलं एका अप्सरेचं चित्र आणि त्याला भेटणारी तरुणी, त्याचं बदलणारं आयुष्य या संकल्पनेवर "अप्सरा" हा चित्रपट बेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news