Sunjay Kapur: दहा हजार कोटींची संपत्ती, करिश्माला द्यावी लागली 70 कोटींची पोटगी?

Karishma Kapoor Alimony: 2016 मध्ये करिश्मा आणि संजय वेगळे झाले यावेळी करिश्माला 70 कोटींची पोटगी मिळाली
Entertainment News
करिश्मा आणि संजयPudhari
Published on
Updated on

sunjay Kapoor net Worth

करिश्मा कपूरचे माजी पती आणि प्रसिद्ध बिझिनेसमन संजय कपूर यांचे काल निधन झाले. पोलो खेळताना त्यांना हार्ट अटॅक आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. करिश्मापासून फारकत घेतल्यानंतर संजय पत्नी प्रियासोबत सचदेवसोबत युके मध्ये रहात होते. संजय कपूर हे नाव अभिनेत्री करिश्मा कपूरसोबतच्या लग्नानंतर पेज थ्रीवरच्या चर्चेत झळकू लागले. करिश्मापासून संजय यांना दोन मुले तर दुसरी पत्नी प्रिया यांना एक मुलगा आहे.

मिशिगन येथे जन्मलेल्या संजय यांचे बालपण दिल्लीत गेले. डून स्कूलमधील शिक्षणानंतर त्यांनी मॅसॅच्युसेट्समधील द विलिस्टन नॉर्थम्प्टन स्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेला.

कपूर यांनी बकिंगहॅम विद्यापीठातून कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि एचआरमध्ये बीबीए केले. त्यांनी एक्झिक्युटिव्ह प्रोग्राममध्ये भाग घेण्यासाठी एमआयटीमध्ये प्रवेश घेतला आणि नंतर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून ओनर-प्रेसिडेंट मॅनेजमेंट (ओपीएम) प्रोग्राम पूर्ण केला. २०१५ मध्ये, वडिलांच्या निधनानंतर संजयने त्यांच्या सोना ग्रुपचा व्यवसाय हाती घेतला.

Entertainment News
Sanjay Kapoor : प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे माजी पती संजय कपूर यांचे ह्रदयविकाराने निधन

एकूण संपत्ती किती?

एका वेबसाइटवरील वृत्तानुसार संजय कपूरची अंदाजे संपत्ती 10, 300 कोटी इतकी आहे. संपत्तीबाबत ते जगात 2703 व्या स्थानावर होते. सोना कॉमस्टार या कंपनीचे ते अध्यक्ष होते.

Entertainment News
Shashank Ketkar: चार लोक मेले की बघू, जगण्याची किंमत शून्य; अभिनेता शशांक केतकरची उद्विग्न पोस्ट

करिश्मासोबतचा घटस्फोट आणि पोटगी

2016 मध्ये करिश्मा आणि संजय वेगळे झाले. यावेळी करिश्माला 70 कोटींची पोटगी मिळाली. यानंतर दोन्ही मुलांची कस्टडी करिश्माला मिळाली. मुलांच्या संगोपनासाठी संजय करिश्माला दर महिन्याला पैसेही देत असे. घटस्फोटानंतर संजयने 14 कोटींचे बॉन्ड मुलांसाठी खरेदी केले होते. तसेच वडीलोपार्जित घरही करिश्माच्या नावावर केले होते. करिश्मा संजयची दुसरी पत्नी होती. संजयने 2001 मध्ये नंदिता महतानीसोबत लग्न केले होते. 2003 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला होता. यानंतर 10 दिवसांतच संजयने करिश्मासोबत लग्नाची घोषणा केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news