

पुढारी ऑनलाईन डेस्क - किरण रावच्या लापता लेडीजची ऑस्करमध्ये एन्ट्री झाली होती. पण त्यास फायनलमध्ये स्थान मिळाले नाही. लापता लेडीजला मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळाली असली तरी आता तिला चोरीच्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे. समीक्षकांचा दावा आहे की, तो २०१९ ची अरबी शॉर्ट फिल्म बुर्का सिटी सारखाच आहे. दोन चित्रपटांची तुलना करणाऱ्या एका व्हायरल व्हिडिओमुळे टीका होताना दिसत आहे.
किरण रावचा चित्रपट लापता लेडीज ऑस्कर २०२५ मध्ये ऑफीशियल एन्ट्री म्हणून निवडण्यात आले होता. पण फायनल स्पर्धेत टीकाव लागला नाही. दरम्यान, समीक्षकांकडून कौतुक मिळवणाऱ्या लापता लेडीजमध्ये प्रतिभा रांटा, नितांशी गोयल आणि स्पर्श श्रीवास्तव मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या कहाणीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते आणि आता पुन्हा एकदा त्याची चर्चा होतेय. लापता लेडीजवर कथा चोरल्याचा आरोप होत आहे. असे म्हटले जात आहे की, लापता लेडीज अरबी चित्रपट बुर्का सिटीची नक्कल आहे.
लापता लेडीज आणि बुर्का सिटीचे दोन क्लिप व्हायरल होत आहे. या दोन्ही व्हिडिओमध्ये सारख्या गोष्टी दिसत आहेत. बुर्का सिटीची कहाणी एक नव्या कपलच्या अवतीभोवती फिरते, जो आपल्या पत्नीच्या शोधात असतो. बुर्का सिटी फॅब्रिस ब्रॅकच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला २० मिनिटांची अरबी कॉमेडी आहे. उमर मेब्रोक, चाडिया अमजोद, जलाल अल्ताविल आणि नोमन होस्नी यांचा हा चित्रपट २०१९ मध्ये रिलीज होता. मिडल ईस्टच्या एका शहरातमध्ये सेट आहे, 'जिथे महिला बुर्का घालतात, एक नवं विवाहित जोडपं वादात अडकतात. जेव्हा सर्वकाही समस्या सुटतात, तेव्हा युवकाला समजते की, तो चुकीच्या महिलेसोबत घरी आला आहे.'
यानंतर आता सोशल मीडियावर लापता लेडीजने कथा चोरल्याचा आरोप केला जात आहे. एका सोशल मीडिया युजरने लिहिलं-"बॉलीवूडमध्ये आता काहीही ओरिजनल राहिलेलं नाही...!" दुसऱ्या युजरने लिहिलं, "बॉलीवूडची कोणतीही गोष्ट कला, खरी वाटत नाही. ते सर्व ... कॉपी पेस्ट केलेलं आहे." एका एक्स युजरने लिहिलं, "तर तुम्ही यास काय म्हणाल? इन्स्पिरेशन वा नक्कल?"