Lalbaugcha Raja | लालबागचा राजाचे दर्शन घेतेवेळी अभिनेत्री सिमरन बुधरूपशी वाईट वर्तणूक (Video)

लालबागचा राजाचे दर्शन घेतेवेळी अभिनेत्री सिमरन बुधरूपशी वाईट वर्तणूक (Video)
Simran Budharup shared Lalbaugcha Raja video
लालबागचा राजाचे दर्शन घेतेवेळी अभिनेत्री सिमरन बुधरूपला वाईट अनुभव आला Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी प्रचंड गर्दी असते. दरम्यान, टीव्ही अभिनेत्री सिमरव बुधरुप आपल्या आईसमवेत लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली. पण, तिथे जो प्रकार घडला, त्या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबतच हेदेखील सांगितले की, मंदिरात दर्शन करण्यासाठी गेल्यानंतर तिच्यासोबत किती वाीट वर्तणूक करण्यात आली.

सिमरनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लालबागचा राजा पंडालच्या बाउन्सरनी तिच्या आईसोबत धक्काबुक्कीचा आरोप केला आहे.

निराशाजनक लालबागच्या राजाचे दर्शन - सिमरन बुधरुप 

सिमरनने आपल्या इन्स्टाग्रामवर जो व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात लिहिलंय-आज, मी आईसोबत आशीर्वाद घेण्यासाठी लालबागचा राजा येथे गेले होते. पण, कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या व्यवहारामुळे आम्हाला खूप वाईट अनुभव आला. संघटनेच्या एका व्यक्तीने माझ्या आईचा फोन हिसकावून घेतला, जेव्हा माझी आई फोटो क्लिक करत होती. ती माझ्या मागे रांगेत होती, असे पण नव्हते की, ती खूप वेळ घेऊन फोटो काढत होती. कारण, दर्शनसाठी माझी वेळ होती. जेव्हा त्यांनी फोन परत घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी धक्का दिला.

पुढे तिने लिहिले -मी मध्ये जाऊन थांबवण्याचा प्रयत्न केला आणि बाऊन्सरनी माझ्यासोबत गैरवर्तणूक केली. जेव्हा मी हे सर्व रेकॉर्ड करणे सुरू केले तेव्हा माझा फोटोनदेखील त्यांनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओमध्ये मी ओरडत होते, असे करू नका, तुम्ही हे काय करत आहात. जेव्हा त्यांना समजले की मी एक अभिनेत्री आहे, तेव्हा ते मागे झाले.

पुढे तिने म्हटले की, लोक पॉझिटिव्हिटी आणि आशीर्वादाच्या शोधात चांहल्या भावनेने अशा ठिकाणी येतात. त्याऐवजी, आम्हाला आक्रमकता आणि अनादराला सामोरे जावे लागले. मी समजू शकते की, गर्दी नियंत्रित करणे आव्हानात्मक आहे, पण कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे की, त्यांनी कोणत्याही दुर्व्यवहार वा भक्तांना नुकसान पोहोचवू नये, चांगली व्यवस्था ठेवण्यात यावी

सिमरन म्हणाली, या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत होण्यासाठी व्हिडिओ शेअर करत आहे. अपेक्षा करते की, येणाऱ्या भक्तांसाठी सन्मान आणि मान देऊन व्यवहार करतील...

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news