Lakhat Ek Amcha Dada | तुळजा, जालिंदरच सत्य सर्वांसमोर आणणार?

मकरसंक्रांतीला सूर्या आणि तुळजाच नातं नवीन वळण घेणार
Lakhat Ek Amcha Dada
तुळजा, जालिंदरच सत्य सर्वांसमोर आणणार?Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत दादा राजला पोलिसांच्या ताब्यात देतो. सरनौबत जालिंदरला फोन करून पुतण्याला रिमांड होमला जाण्यापासून वाचवण्यासाठी मदत मागतात. पण, जालिंदर याला नकार देतो. कारण त्याला माहित आहे की, सूर्या कधीच त्याच्या बहिणीच्या सन्मानासमोर तडजोड करणार नाही. सूर्या, जालिंदरला विचारतो की, त्याला भाग्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल आधीपासून माहिती होतं का? जालिंदरच्या उत्तरावर सूर्या नाराज होतो. भाग्या, सूर्याची माफी मागत, म्हणते की तिने स्वतःची जास्त काळजी घ्यायला पाहिजे होती. सूर्या तिची यात काहीच चूक नसल्याचे सांगतो. या सगळ्यात मकर संक्रांतीचा सण साजरा करायची तयारी सुरु आहे. (Lakhat Ek Amcha Dada)

एकीकडे जालिंदर शालन आणि मालनमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे सूर्या आणि तुळजा या सणासाठी जालिंदरकडे आलेत. तुळजाकडे शत्रूविरुद्ध पुरावे आहेत. इकडे शत्रूला कळतं की, तुळजाकडे काही पुरावे आहेत जे बाहेर आले तर आपलं काही खरं नाही समजल्यावर शत्रू खूप घाबरलाय. शत्रू तेजुला धमकावतो आणि तुळजाकडून पुरावे आणायला सांगतो. तुळजा सगळ्यांना लग्नाचे फोटो पाहण्यासाठी हॉलमध्ये बोलावते.

आता शत्रू आणि जालिंदरचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार ? वर्षाच्या पहिल्या सणाला सूर्या-तुळजाचं नातं कोणतं नवीन वळण घेणार? यासाठी बघायला विसरू नका 'लाखात एक आमचा दादा' रोज रात्री ९:३० वा. झी मराठीवर पाहा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news