Lakhat Ek Aamcha Dada | तुळजा प्रेमाची खरी कबुली देण्यासाठी नदीत मारणार उडी

"तुळजा- सूर्याच्या प्रोपोजल सीनसाठी" मी पहिल्यांदा नदीत उतरले" - दिशा परदेशी
Lakhat Ek Aamcha Dada tv serial
लाखात एक आमचा दादा तुळजा - सूर्याचे प्रेम फुलणार instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - "लाखात एक आमचा दादा" मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. मालिकेत एक रोमांचक आणि इमोशनल क्षण येत आहे. ज्याची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तो क्षण म्हणजे तुळजा आणि सूर्या मधल्या प्रेमाची सुरुवात. तुळजा सूर्याला नदीच्या पात्रात प्रोपोज करणार आहे. या आधी फक्त सूर्याचं, तुळजासाठी प्रेम पहिले होते, पण आता तुळजाच्या या साहसी कृत्यामुळे प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव मिळणार आहे . तुम्हाला ही खरं नाही वाटलं ना. सूर्याचं ही तसचं काहीस होणार आहे. जे प्रोमो मध्ये तुम्ही पाहिलंच असेल. परंतु तुळजा प्रेमाची खरी कबुली देण्यासाठी नदीत उडी मारणार आहे.

प्रोपोजलचा प्रोमो पाहून जशी तुमची उत्सुकता वाढली, असेल अगदी तशीच तुळजा म्हणजेच दिशा परदेशीही उत्सुक आहे कारण तिने पहिल्यांदाच असा सीन शूट केलाय. आपली उत्सुकता व्यक्त करताना दिशा म्हणते, "तुळजाचा प्रपोजल सीन खूप युनिक आहे , मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं काही अनुभवतेय. आम्ही नदीत शूट केलंय आणि नदीला बऱ्यापैकी प्रवाह होता. मला पाण्यात उडी मारायची होती, पाणी खूप थंड होतं आणि हा सीन सर्वांसाठी महत्वाचा होता. वेळ घेऊन आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊनच सीन शूट होत होता. मी हा अद्वितीय अनुभव कधीच विसरू नाही शकणार.

मी साडी नेसली होती, मला साडी आणि मेकअप दोन्ही सांभाळायचा होता आणि एक्सप्रेशन देऊन डायलॉग्स ही बोलायचे होते सगळं एकत्र मॅनेज करून निभावणं मला प्रचंड वेगळा अनुभव देऊन गेला. शूट करत असताना नितीश आणि माझ्या पायाला मोठ- मोठे दगड टोचत होते पण आम्ही हा सीन पूर्ण केला. जवळपास ५-६ तास तो सीन सुरु होता आणि तितका वेळ आम्ही पाण्यात होतो. आम्हीच नाही तर पूर्ण टीमने ही तितकीच मेहनत केली आणि थोडं दुखणं, खुपणं झालं, पण आम्ही खूप मज्जा ही केली. जेव्हा प्रोमो पहिला तेव्हा खूप भारी वाटलं कारण, तेव्हा माहित नव्हतं की, प्रेक्षकांना कसं वाटेल, त्यांना आवडेल की नाही. खूप विचार केला गेला होता की तुळजा कशी, सूर्याला प्रोपोज करेल. खूप चर्चेनंतर हा सीन फायनल झाला. पण आता लोकांचा प्रतिसाद पाहून सर्वांच्या मेहनतीचं चीज झालंय असं वाटतंय. प्रेक्षकही उत्सुक होते की कधी तुळजा- सूर्याची प्रेम कहाणी सुरु होईल याची.

तुळजाच्या प्रोपोजलला काय असेल सूर्याच उत्तर? 'लाखात एक आमचा दादा' रोज रात्री ८:३० वा. झी मराठीवर पाहा.

Lakhat Ek Aamcha Dada tv serial
Children's Day | आर. के. नारायण यांच्या 'मालगुडी डेज' या अजरामर कथांना उजाळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news