

पुढारी ऑनलाईन डेस्क - कुणाल कामराने BookMyShow ला एक ओपन लेटर लिहिलं होतं. ज्यामध्ये त्याने कंपनीवर आरोप लावला होता की, वेबसाईटने त्याला डीलिस्ट केलं आहे. आता कंपनीने यास उत्तर दिले आहे.
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने काल आरोप केले होते की, BookMyShow ने त्याला डीलिस्ट केलं आहे. कुणालने ओपन लेटर लिहून खूप काही सुनावलं होतं. आता बुक माय शो कंपनीने एक स्टेटमेंट जारी करून म्हटलं आहे की, फॅक्ट्सशी छेडछाड करून माहिती सादर करण्यात आली आहे. कंपनीची चुकीची भूमिका दर्शवण्यात आलीय.
BookMyShow ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर स्पष्टीकरण देत पोस्ट केले आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे, “BookMyShow एक प्लॅटफॉर्मच्या रूपात तिकीट विक्रीची सुविधा प्रदान करते, जी भारताच्या कायद्याचे पालन करते.” शो ने हे स्पष्ट केलं आहे की, शोची लिस्टिंग वा डीलिस्टिंगचा निर्णय आयोजक वा ठिकाणाचे असते. त्यांची कंपनी हा निर्णय घेत नाही. आमची भूमिका चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आली आहे. आम्ही कोणत्याही कलाकाराला त्याच्या शोचे तिकीट्स कोणत्याही वेबसाईटवर विकण्यापासून रोखू शकत नाही.”
कुणाल कामराने BookMyShowला एक खुले पत्र लिहिले होते. ज्यामध्ये त्याने आरोप केला होता की, कंपनी त्याची माहिती शेअर करण्यात असमर्थ आहे... BookMyShow ने म्हटले की, शो कलाकारांना आपल्या वेबसाईट्सवर तिकीट विक्री करण्यापासून थांबवत नाही आणि त्यांची भूमिका केवळ तिकीट विक्रीची सुविधा प्रदान करण्यापर्यंत मर्यादित आहे. कंपनी तटस्थ राहून काम करते.
हा वाद तेव्हा वाढला जेव्हा शिवसेना नेते राहुल कनाल यांनी BookMyShow ला विनंती केली होती की, त्यांनी कुणाल कामराच्या शोला प्रोत्साहित करणे बंद करावे. यानंतर कुणाल कामराचे नाव कलाकारांच्या यादीतून हटवल्याचेही वृत्त समोर आले होते. उत्तरादाखल BookMyShow ने सांगितलं की, शोच्या लिस्टिंगचे निर्णय आयोजक आणि ठिकाणाचे आहे, बूक माय शोची भूमिका केवळ तिकीट विक्रीची सुविधा प्रदान करते.