सावंतवाडीत पार पडला ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’चा प्रीमियर शो

क्षेत्रपाल श्री देव वेतोबा
क्षेत्रपाल श्री देव वेतोबा

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेक्षकांना गेल्या कित्येक दिवसांपासून 'क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा' ह्या मालिकेबाबत उत्सुकता लागून राहिली होती. अखेर 'क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा' मालिकेचा प्रवास सुरु झाला. कोकणचा रक्षणकर्ता या नात्याने, श्री देव वेतोबा कोकणात अजूनही वास करतो असा अनेकांचा विश्वास आहे. वेतोबावर लोकांची मनापासून श्रद्धा आहे.

'क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा' या मालिकेच्या लाँच प्रित्यर्थ आपल्या सावंतवाडीतील मोती तलाव येथे पहिल्यांदाच श्रीदेव वेतोबाची एक भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती. वेतोबाचे वर्णन अनेकांनी त्यांच्या भावनेतून, अनुभवातून केले आहे. पण आपल्या डोळ्यांसमोर वेतोबाची भव्य दिव्य प्रतिकृती पाहणे हा प्रेक्षकांसाठी विलक्षणीय अनुभव होता. प्रतिकृतीसमोर श्री देव वेतोबा यांच्या महाआरतीचा क्षणही प्रेक्षकांना अनुभवता आला.

इतकेच नव्हे तर, वैश्य भवन हॉल, गवळीवाडा, सावंतवाडी येथे 'क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा' मालिकेतील कलाकार उमाकांत पाटील (वेतोबा), राजेश भोसले (बाबी रेडकर), प्राजक्ता वाडये (बायो रेडकर), दिपक कदम (धाकल्या सोनार), विवेकानंद गोरे (खोत), पूजा महेंद्र (मंजू) आणि अनिल गावडे (दादा परब) या ठिकाणी उपस्थित होते. सर्व कलाकारांसोबत पहिला भाग बघण्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news