Govinda Wife Controversy: जिने आपल्या पतीलाच ठार मारण्याचा प्रयत्न केला.. गोविंदाच्या पत्नीवर कोमलचा गंभीर आरोप; वाद चिघळणार?

घर फोडल्याच्या आरोपावर कोमल राणी स्वर्णकारचे जोरदार प्रत्युत्तर; गोविंदाच्या पत्नीवर केले गंभीर आरोप
Govinda Wife Controversy
Govinda Wife ControversyPUDHARI
Published on: 
Updated on: 

Govinda wife controversy Komal Rani Swarnkar: बॉलीवूड अभिनेता गोविंदा आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळं चर्चेत आला आहे. गोविंदा गेल्या काही दिवसांपासून एका मराठी अभिनेत्रीसोबत सतत दिसत आहे. त्यामुळं तो सतत प्रसिद्धीझोतात येत आहे. नुकतेच त्याने लालबागचा राजाचे दर्शन घेतलं. त्यावळी रूपा या आगमाी चित्रपटातील त्याच्यासोबत काम करणारी कोमल राणी स्वर्णकार ही देखील उपस्थित होती.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्याला आता कोमल राणी स्वर्णकारने प्रत्युत्तर दिलं आहे.

Govinda Wife Controversy
Govinda Wife: ‘माझ्या आयुष्यात काही राक्षस,माझा संसार उद्ध्वस्त करणाऱ्यांचा नाश..’! : गोविंदाची पत्नी सुनीता आक्रमक

कोमल राणीची इन्स्टा स्टोरी

कोमल राणीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यापोस्टद्वारे तिने आपला राग व्यक्त केला. कोमल पोस्टमधून गोविंदासोबत तिच्या नात्याबद्दल करण्यात येत असलेल्या आरोपांवर देखील उत्तर दिलं.

शनिवारी २६ सप्टेंबरला तिने ही इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेली होती. त्यात जी महिला आपल्या पतीला अनेक वर्षापासून ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे तिचे शाप कधीच कोणाला लागत नाहीत. आधीच तुटलेल्या घरात कोणीही कधीही होम ब्रेकर होऊ शकत नाही.

Govinda Wife Controversy
Sunita Ahuja and Govinda: माणूस धोकेबाज, त्यापेक्षा जनावरांवर.. गोविंदा अन् कुंकू लागलेल्या राणीला एकत्र पाहून भडकल्या सुनिता

त्यांच्यावर विश्वास ठेवू नये

कोमल आपल्या स्टोरीत पुढे लिहिते की, 'कोणतीही समर्पित पत्नी आपल्या पतीसोबत इतके वाईट वागू शकते असे मला वाटत नाही.' कोमलने सुनिता यांच्या आरोपांवर देखील टीका केली. ती म्हणते की लोक पूर्ण माहिती न घेता कोणत्याही पुराव्याशिवाय बोलतात, त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ नये.'

Govinda Wife Controversy
Who Is Komal Rani Swarnkar: गोविंदासोबत दिसली अन् रातोरात फेमस झाली; अफेअरचीही चर्चा, कोण आहे कोमल राणी स्वर्णकार?

लालबाग दर्शनावरून गोविंदाचा खुलासा

कोमल राणीसोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर गोविंदाबाबत वेगळीच चर्चा माध्यमांमध्ये सुरू होती. गोविंदाने कोमलसोबत दुसरे लग्न केलं असून ते जोडीने लालबागच्या दर्शनासाठी आले होते असा दावा करण्यात येत होता.

यावर गोविंदाने स्पष्टीकरण देत सांगितलं की, यात कोणाची चूक नसून ही एक विचापूर्वक केलेली चाल आहे. अशा गोष्टी होतच राहणार आहेत. या गोष्टी मला माझ्या कुटुंबापासून दूर करण्यासाठी समाजात माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी मुद्दाम केल्या जात आहेत. मी माझ्या कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टावर लक्ष देत नाही. अनेक लोक माझे कौतुक देखील करतात.

Govinda Wife Controversy
Govinda: अभिनेता गोविंदा घरात अचानक बेशुद्ध; तातडीने रुग्णालयात दाखल

मी करिष्मासोबत देखील....

भेले अफेअर असो किंवा नसो हा कोणासाठी देखील मुद्दा असू नये. मी काम करत आहे. मी एक प्रोफेशनल नातं निभावत आहे. मी माझा चित्रपट रूपासाठी प्रार्थना करायला लालबागच्या राजाच्या दरबारात गेलो होते. मी यापूर्वी करिष्मा कपूरसोबत मंदिरात गेले होते. आता राणी स्वर्णकार यांच्यांसाबोत गेलो आहे. मी प्रार्थना केली कारण मी खूप काळानंतर पुन्हा काम सुरू करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news