कोल्हापूरच्या कलाकाराचा चित्रपट ‘ह्या गोष्टीला नावच नाही’

New Film : अभिनेता जयदीप कोडोलीकरचे चित्रपटसृष्टीत पदार्पण
New Film
अभिनेता जयदीप कोडोलीकर नव्या मराठी चित्रपटात दिसणार आहे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - आताच्या तरुण पिढीकडे प्रचंड टॅलेंट आहे. भन्नाट कल्पना आहेत. याच जोरावर अनेक नवे चेहरे काहीतरी वेगळं करू पाहतायेत. आपली कला जपणारा अभिनेता जयदीप कोडोलीकरला एक वेगळी ओळख मिळाली. कलेच्या प्रांतात मुशाफिरी करणारा जयदीप आता आता मोठ्या पडद्याच्या माध्यमातून आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आणि संदीप सावंत दिग्दर्शित आगामी ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ या चित्रपटात मुकुंदच्या मध्यवर्ती भूमिकेत त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटासाठी ‘२० व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल मध्ये इंडियन कॉम्पिटिशन विभागात’ जयदीपला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळला आहे. ८ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून भावभावनांचे कंगोरे उलगडणाऱ्या टिझरमधून मुकुंदच्या भावविश्वाची झलक पहायला मिळते आहे. जयदीप सोबत प्रथमेश अत्रे, चैतन्य जवळगेकर, अनुराधा धामणे, अवधूत पोतदार, सीमा मकोटे, प्रतीक्षा खासनीस आदी कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. इचलकरंजी, जयसिंगपूर, सांगली आणि गणेशवाडीचे विशेष सहकार्य या चित्रपटासाठी लाभले आहे.

नात्यांचा ऋणानुबंध जपत जगणं शिकवणारा हा चित्रपट माझ्यासाठी खूप म्हत्त्वाचा असल्याचं जयदीप सांगतो. डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील यांच्या 'मृत्यूस्पर्श' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट सर्वांना लढण्याचं बळ निश्चितच देईल.

‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाचे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, डॉ. सतीशकुमार आदगोंडा पाटील, डॉ. अंजली सतीशकुमार पाटील निर्माते आहेत. मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते रजत गोस्वामी आहेत. पायोस मेडिलिंक्स प्रायव्हेट लिमिटेड, जयसिंगपूर निर्मित ‘ह्या गोष्टीला नावच नाही’ चित्रपटाची पटकथा-संवाद-दिग्दर्शन संदीप सावंत यांचे आहे. छायाचित्रण प्रियशंकर घोष तर संकलन दिनेश पुजारी यांनी केले आहे. साऊंड डिझाइन सुहास किशोर राणे यांचे आहे. पार्श्वसंगीत विवेक पाटील, आकाशजाधव यांचे आहे. वेशभूषा कुलदीप चव्हाण, सेजल पाटील, राजश्री चारी यांची आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news