

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेटर केएल राहुल आणि सुनील शेट्टीची कन्या अथिया शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अथियाने गोंडस चिमुकलली जन्म दिल्यानंतर आता तिचं नाव ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वी अथिया आणि राहुल यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून एक गोड फोटो शेअर करत आपल्या बाळाची पहिली झलक जगासमोर आणली होती. या फोटोमध्ये बाळाचं पूर्ण चेहरा दिसत नसला तरी तिच्या लहानशा बोटांमध्ये गुंफलेले आई-बाबांचे हात हे चित्र खूप काही सांगून जातं.
या खास क्षणासोबत त्यांनी आपल्या बाळाचं नावही जाहीर केलं आहे. "इवारा" (Evaarah) हे सुंदर नाव ठेवण्यात आले असून त्याचा अर्थ "देवाची खास देणगी" असा आहे.
राहुलने पोस्टमध्ये लिहिलं : "तुझ्या हातात आमचं जग आहे... तू आलीस आणि आमचं आयुष्यच बदलून गेलं. Welcome to the world, Evaarah." या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या.