

पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते किरण माने हॉस्पीटलमध्ये दाखल. याबाबत किरण माने यांनी स्वत:, आज हाॅस्पीटल... यावरही मात करून यातून बाहेर पडेन" अशी आशयाची आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. (Kiran Mane Facebook)
आपल्या अभिनय कौशल्याने आपला चाहता वर्ग निर्माण केलेले अभिनेते किरण माने नेहमी आपल्या पोस्टमुळे चर्चेत असतात. ते नेहमी आपल्या सोशल मिडियावर वेगवेगळ्या विषयावर बिनधास्तपणे व्यक्त होत असतात.
किरण माने मंगळवारी (दि.३०) आपण हाॅस्पीटलमध्ये दाखल झाले. याबाबत त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "काल दुपारपर्यंत फिट, तंदुरूस्त, हसतखेळत होतो. आज हाॅस्पीटल. सलाईन,इंजेक्शन्स आणि प्रचंड असह्य वेदना. आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं ! अर्थात, यावरही मात करून यातून बाहेर पडेन. फिकीर नाॅट."