दाक्षिणात्य सिनेसृष्टितील अभिनेता हरिष राय यांचे निधन झाले आहे. हरिष यांनी केजीएफमध्ये रॉकी म्हणजेच यशच्या काकांची व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांचे कौतुकही झाले होते. हरिष बराच काळ थायरॉईड कॅन्सरशी झुंज दिली होती. केजी एफ 2 च्या दरम्यानही त्यांची कॅन्सरशी झुंज सुरूच होती. (Latest Entertainment News)
केजीएफमध्ये त्यांनी लांब दाढी ठेवली होती. याचे कारण विचारताच ते म्हणाले की कॅन्सरने घशाला आलेली सूज दिसू नये यासाठी हरिष यांनी लांब दाढी ठेवल्याचे सांगितले. त्यावेळीही कॅन्सरशी त्यांची झुंज सुरूच होती. मृत्यूपूर्वी त्यांचा कॅन्सर पोटापर्यंत पसरला होता. कॅन्सरने त्यांच्या शरीराला पुरते पोखरले होते.
ज्याचा शेवट त्यांच्या मृत्यूमध्ये झाला. हरिष यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की त्यांना उपचारादरम्यान अनेकदा पैशाच्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनी कलाकारांकडे मदत मागण्याबाबत विचारही केला होता. पण मागू शकले नाही. 'राज बहादुर', 'संजू वेड्स गीता' आणि 'भूगत' या सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले.