

पुढारी ऑनलाईन डेस्क - दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशने तिचा लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड अँटोनी थट्टीलसोबत लग्न गाठ बांधली. गोव्यामध्ये १२ डिसेंबर रोजी तिने विवाह केला. साऊथ चित्रपटाची स्टार कीर्ती सुरेश लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर अँटोनी एक बिझनेसमॅन आहे. ती अँटोनीला १५ वर्षांपासून डेट करत होती. १५ वर्षांनंतर दोघांनी लग्न केले. साऊथच्या रितीरवाजाप्रमाणे दोघांनी फेरे घेतले.
अँटोनी थट्टील एस्परोस विंडो सॉल्यूशन्सचा मालक आहे. तो एक दुबई बेस्ड बिझनेसमॅन आहे. तो कोच्चीचा राहणारा आहे. कीर्ती सुरेश-अँटोनी थट्टील १५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. कीर्ती बॉयफ्रेंड अँटोनीला भेटली होती, तेव्हा ती शाळेत होती. अँटोनी त्यावेळी कॉलेजमध्ये होता.
तेव्हा दोघांच्या भेटीत मैत्री झाली अन् नंतर प्रेम झालं. आता हे नवे कपल एका नव्या नात्यात बांधले गेले आहे. अँटोनी-कीर्ती यांच्या लग्नात जवळचे नातेवाईक, मित्र-मंडळी आणि सेलिब्रिटी उपस्थित होते. स्टार थलापती विजयने देखील लग्नात हजेरी लावली. त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कीर्ती सुरेश ‘कल्की’ चित्रपटानंतर बॉलीवूडपट ‘बेबी जॉन’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार आहे.