Adult star Kylie Page death
अमेरिकन अभिनेत्री आणि अडल्ट स्टार कायली पेज हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ती 28 वर्षांची होती. लॉस एंजल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कायलीच्या मृत्यूची पुष्टी केली. कायलीचा तिच्या घरातच मृत्यू झाला.
तिच्या मृत्यूचे नेमके कारण अजून समोर आलेले नाही. तिच्या अचानक मृत्यू संदर्भात अधिक तपास केला जात आहे. कायलीच्या मैत्रिणीने तिच्याशी संपर्क होत नसल्याने पोलिसांना कळवले असता राहत्या घरी तिचा मृतदेह मिळून आला. तिच्या मृतदेहाजवळ काही ड्रग्स आणि तिच्या शूट दरम्यानचे फोटो विस्कटलेले आढळून आले. तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे यावेळी समोर आले.
कायलीचे मूळ नाव कायली प्लायंट हे होते. कायलीने 2016 मध्ये तिच्या करियरची सुरुवात केली होती. यानंतर तिने अमेरिकेतील जवळपास सगळ्याच प्रसिद्ध अडल्ट कंटेंट कंपन्यांसोबत काम केले आहे. 2016 पासून तिने जवळपास 200 हून अधिक अडल्ट सिनेमामांध्ये काम केले आहे.
एका प्रसिद्ध अडल्ट साईटने तिला x या प्लॅटफॉर्मवरुन श्रद्धांजली वाहिली आहे. कायली तिच्या आनंदी राहण्यासाठी, दयाळू राहण्यासाठी ओळखली जात होती. ती जाईल तिथे आनंद आणेल यात शंका नाही. तिचे कुटुंबीय आणि मित्रांना अशा कठीण प्रसंगी धैर्य मिळो ही प्रार्थना.
तर तिची जवळची मैत्रीण आणि सहकारी म्हणते, ‘ ती खरंच चांगली होती. जिला हसायला आणि हसवायला आवडत होते. ती आयुष्याने आनंदाने जगण्यावर विश्वास ठेवत होती. ती जिथे असेल तिथे आनंदात असेल अशी अशा आपण करूया.