

कांतारा सिनेमा रिलीज झाला असून त्याची घोडदौड जोरात सुरूही आहे. सिनेमाने आपल्या पहिल्या वीकएंडमध्येच कमाईचा मोठा आकडा गाठला आहे. या सिनेमाचा सीन आणि व्यक्तिरेखांची चर्चा सगळीकडे होते आहे. पण या दरम्यान एक असा व्हीडियो व्हायरल झाला की फॅन्सनी सोशल मिडियावर चांगलीच आगपाखड केली आहे. (Latest Entertainment News)
तामिळनाडूच्या दिंडीगुल येथे कांतारा 1 चे स्क्रीनिंग सुरू होते. यावेळी एक फॅन दैवच्या गेट अपमध्येच थिएटरमध्ये आला. त्यानंतर त्याने दैवसारखा डान्सही केला. यावेळी सेक्युरिटीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. हा सोशल प्रमोशनचा प्रकार नाही हे लक्षात आल्यावर फॅन्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हा व्हीडियो व्हायरल होताच लोकांनी या प्रकाराला आस्थेचा अपमान असल्याचे सांगितले. अनेक युजर्सचे असे म्हणणे होते की दैवचे रूप असेच कोणीही धारण करू शकत नाही. यासाठी खास धार्मिक विधी आणि तपस्येची गरज असते. एक युजर म्हणतो, दैवचे रूप म्हणजे एक परंपरा आहे. ज्याला कुठेही दाखवणे चुकीचे आहे. तर एकाने हा संस्कृतीचा अपमान असल्याने याला ग्लॅमर देऊ नये असे म्हणले आहे.
अर्थात याला विरोधी असा एक दुसरा मतप्रवाहही आहेच की, लोक म्हणत आहेत की दैवच्या या व्यक्तिरेखेने लोकांना इतके प्रभावित केली आहे की लोक त्याच्याशी जोडले गेले आहेत. पण अशा आस्थाना हात घालण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे.