

पुढारी ऑनलाईन डेस्क - समीक्षकांनी ‘कंगुवा’ चित्रपटाला जबरदस्त रिव्ह्यू दिले आहेत. आज १४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टमुळे लोकांमध्ये चित्रपटामुळे खूप उत्सुकता आहे. रिलीज आधी या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग झाले होते. तगड्या कलाकारांमुळे हा चित्रपट आणखी उंचीवर पोहोचला आहे. सूर्या मुख्य भूमिकेत अशून सूर्याचे फॅन फॉलोईंग प्रचंड आहे. शिवाय बॉलिवूड अबिनेता बॉबी देओलच्या खतरनाक अभिनयामुळे साऊथ-बॉलिवूडचा अभिनय आणखी बहरला आहे.
'कांगुवा'च्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर सूर्या 'कंगुवा' आणि 'फ्रान्सिस थिओडोर'ची भूमिका साकारत आहे. बॉबी देओल 'उधीरन'ची भूमिका साकारत आहे. बॉलवूड अभिनेत्री दिशा पटानी 'एंजेलीना'ची भूमिका साकारत आहे. योगी बाबू 'कोल्ट 95'ची भूमिका साकारत आहे आणि रॅडिन किंग्सले 'एक्सलेटर'च्या भूमिकेत दिसणार आहे. तुम्हाला माहितीये का, सूर्या, बॉबी देओल, दिशा पटानीने किती मानधन घेतले आहे का, माहिती आहे का?
३५० कोटी रुपये खर्चून 'कंगुवा' बनवला आहे. सिरुथाई सिवा दिग्दर्शित चित्रपटासाठी हॉलिवूड तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे ॲक्शन सीन्स खूपच दमदार आहेत.
साऊथ स्टार सूर्याने 'कांगुवा'साठी मोठी रक्कम घेतली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्याने या चित्रपटात काम करण्यासाठी ३९ कोटी रुपये घेतले आहेत. कुंगवाच्या स्टार कास्टमध्ये ही सर्वाधिक फी आहे.
'कांगुवा'मध्ये बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहे. बॉबी देओलने या चित्रपटात 'उधीरन'ची भूमिका साकारण्यासाठी ५ कोटी रुपये फी आकारली आहे.
‘कंगुवा’मध्ये साऊथ स्टार कार्तीही आहे. या चित्रपटात त्याचा कॅमिओ आहे. मात्र, त्याला अभिनयासाठी कती रुपये मिळाले, याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही. यासोबतच इतर कलाकारांची फी देखील कळलेली नाही.
सूर्याच्या या चित्रपटात दिशा पटानीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. दिशा पटानीला ‘कांगुवा’साठी ३ कोटी रुपये मानधन मिळाले आहे. तिचा हा पहिला तमिळ चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.