कणकवलीच्या सद्गुरू भालचंद्र महाराजांची गाथा रुपेरी पडद्यावर

New Marathi Movie | ‘कणकाधीश’ चित्रपटाची घोषणा
kankadhish movie
‘कणकाधीश’ चित्रपटाची घोषणा करण्यात आलीInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - योगियांचे योगी, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमहंस भालचंद्र महाराज यांचा जीवनप्रवास आता मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. कणकवली मध्ये नुकत्याच भालचंद्र महाराज यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त, निर्माते हरेश शशिकांत आईर आणि सौ. अमृता हरेश आईर यांनी ‘कणकाधीश’ या मराठी चित्रपटाची घोषणा करत चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले. महाराजांनी केलेल्या अलौकिक कार्याचा पट ‘कणकाधीश’ या चित्रपटातून उलगडणार आहे.

योगतपस्वी, कणकाधिपती परमहंस भालचंद्र महाराजांची महती, अध्यात्मिक सामर्थ्याची प्रचिती, महाराजांच्या जीवनचरित्रातील अनुभवांचे भावस्पर्शी सादरीकरण प्रत्येकाला महाराजांच्या सान्निध्याची नक्कीच अनुभूती देईल, असा विश्वास ‘कणकाधीश’ चित्रपटाचे निर्माते हरेश शशिकांत आईर यांनी व्यक्त केला.

मृद्रा व्हिज्युअल प्रोडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या ‘कणकाधीश’ चित्रपटाचे लेखन प्रल्हाद कुडतरकर यांचे तर दिग्दर्शन विविध कोरगांवकर करणार आहेत. छायाचित्रण कौशल गोस्वामी, संगीत दिग्दर्शन साई-पीयुष यांचे आहे. कलादिग्दर्शन महेश कुडाळकर यांचे आहे. सहनिर्माते मिलिंद शिंगटे आहेत. या चित्रपटासाठी छत्रपती स्टुडिओ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news