Kalki 2898 AD Box Office : पहिल्याच दिवशी कल्कीची तुफान कमाई

पहिल्याच दिवशी कल्कीची तुफान कमाई
Kalrki's stormy earnings on the first day
सुपरस्टार प्रभासच्या बहुप्रतिक्षित 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केलीआहेKalki 2898 AD File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागा अश्विन दिग्दर्शित कल्की २८९८ एडी रिलीज झाला. सुपरस्टार प्रभासच्या बहुप्रतिक्षित 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. या सायन्स फिक्शन फ्युचरिस्टिक चित्रपटाने सुरुवातीच्या दिवशीच चांगलेच कलेक्शन केले आहे.

'कल्की 2898 एडी' ने पहिल्याच दिवशी भारतात अर्धशतक पूर्ण केले आहे. कल्कीची फॅन फॉलोइंग किती जबरदस्त आहे हे या चित्रपटाच्या कमाईने सिद्ध झाले आहे. देशभरातील चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल झाले. प्रेक्षकांनी चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला होता.

Kalrki's stormy earnings on the first day
मनोरंजन : कायापालटाचे रहस्य

हा विक्रम कल्कीच्या नावावर

'कल्की 2898 एडी'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. त्यावरून हा चित्रपट या वर्षातील सर्वात हिट चित्रपट ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तथापि, 'कल्की 2898 AD' अजूनही एक रेकॉर्ड आहे. 2024 च्या पहिल्या दिवशी हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Kalrki's stormy earnings on the first day
रोहित शर्मा T-20 मध्‍ये @ 150! अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला क्रिकेटपटू

पहिल्या दिवशी केला जोरदार व्यवसाय

'कल्की 2898 एडी'ने पहिल्याच दिवशी भारतात 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. याचा विचार करता आगामी काळात हा चित्रपट आणखी चांगली कामगिरी करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. Sacknilk च्या अहवालानुसार, 'कल्की 2898 AD' ने पहिल्या दिवशी भारतातील सर्व भाषांमध्ये सुमारे 61.18 कोटी रुपयांचा निव्वळ व्यवसाय केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news