

जया बच्चन आणि कॅमेरा हे समीकरण काहीसे वेगळे आहे. आजपर्यंतच्या अनेक व्हीडियोमध्ये फोटो काढणाऱ्या व्यक्तीसोबत त्यांचा उद्धट अंदाज दिसून आला आहे. याशिवाय अनेकदा त्यांनी असे फोटो काढणाऱ्याला खडसावलेही आहे. (Latest Entertainment News)
पण नुकतेच असे काही घडले की जया बच्चन यांच्यामुळे काजोलवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. त्याचे झाले असे की जया बच्चन यांनी अलिकडेच दुर्गा पूजा पंडालला भेट दिली. यावेळी काजोलने न की केवळ जया बच्चन यांना पापाराझ्झीसमोर फोटोसाठी राजी केलेच याशिवाय चक्क कॅमेऱ्यासमोर सगळ्यांना हसवलेही.
अर्थात जया यांनी यावेळी सौम्य चिडचिड केलीच. कारण जेव्हा जया यांनी फोटोसाठी पोझ दिली त्यावेळी पापाराझ्झीनी आरोळ्या दिल्या. यावेळी पुन्हा जया यांनी त्यांना कडक भाषेत शांत राहण्यास सांगितले.
व्हायरल झालेल्या व्हीडियोमध्ये काजोल जया यांना फोटो काढण्याची विनंती करते. विशेष म्हणजे यावेळी जयाही लगेच तयार होतात. अर्थात यावेळी काजोलने असे काही केले की जया यांना हसू आवरणे कठीण झाले. हा व्हीडियो व्हायरल होतो न होतो तोच त्यावर कमेंट्सची बरसात झाली.
एक व्यक्ती म्हणते, ‘काजोलने तर असंभव काम केले. तर दुसरी व्यक्ती म्हणते, 'केवळ काजोलच त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते.’ तर अनेकांनी काजोलच जया यांना सांभाळू शकते अशी कमेंट केले आहे. तर अनेकांनी काजोलला ऑस्कर देण्याची मागणी केली.
काजोल ट्विंकल खन्नासोबत टू मच या टॉक शोचे होस्टिंग करते आहे. याशिवाय अलीकडेच ती हॉरर सिनेमा मांमध्ये दिसली होती.