

पुढारी ऑनलाईन डेस्क - साऊथ स्टार सूर्या शिवकुमार आणि अभिनेत्री ज्योतिका या जोडीने कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घेतले. दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांनीही सेल्फी काढली असून सेल्फी इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर, सुरिया आणि ज्योतिका यांनी १९ एप्रिल रोजी गुवाहाटीच्या मां कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ज्योतिकाने मां कामाख्याबद्दल तिची भक्ती व्यक्त करत फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. (Jyotika and Suriya Visit Ambabai Temple)
ज्योतिकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आई अंबाबाईचा फोटो शेअर करत भेट दिलेल्या मंदिराची झलक देखील दाखवली आहे. ज्योतिकाने कॅप्शनमध्ये लिहिलंय - ''नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापूरच्या महालक्ष्मी आणि कामाख्याच्या पवित्र शक्तीपीठांना भेट देऊन धन्य झालो! माझा पुढचा चित्रपट सुरू करत आहे... तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादांसाठी मी नेहमीच आभारी आहे.''
आगामी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, ज्योतिकाने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत दुसऱ्या सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करताना कसे वाटले, हे सांगितले.
ज्योतिका साऊथची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर सुरिया देखील टॉपचा अभिनेता आहे. ज्योतिका अखेरीस नेटफ्लिक्स सीरीज डब्बा कार्टेलमध्ये दिसली होती. तर सूरिया शेवटी कांगुवामध्ये दिसला होता. (Jyotika and Suriya Visit Ambabai Temple)