.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क - आज १३ ऑगस्ट रोजी श्रीदेवी यांच्या जन्मदिवस आहे. त्या औचित्याने जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर करून पोस्ट केलीय. शेअर केलेल्या एका फोटोमध्ये जान्हवीने आपल्या आईसोबत बालपणीचा फोटो शेअर केला आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती साऊथ इंडियन लूकमध्ये दिसतेय. पिवळ्या रंगाची साडी नेसून टेम्पल ज्वेलरी घातली आहे. दरम्यान ती तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेल्याचे वृत्त समोर आले आहे
जान्हवीने या फोटोंना कॅप्शन लिहिलीय- त्यामध्ये म्हटलंय- Happy birthday Mumma ❤️ I love you
जान्हवीने तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. जान्हवीबरोबर तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया देखील दिसत आहे.