L K Advani | अडवाणींची प्रकृती स्थिर, रुग्णालयातून डिस्चार्ज

'एम्स'मध्ये बुधवारपासून सुरू होते उपचार
BJP leader LK Advani
लालकृष्‍ण अडवाणी ( संग्रहित छायाचित्र)File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: भाजपचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना प्रकृती आता स्थिर असल्याने आज (दि.२७ जून) दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

एम्समधील युरोलॉजी विभागात त्यांच्यावर उपचार

९६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी (दि.२७ जून) रात्री उशिरा दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान एम्सच्या युरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे होते. यानंतर आज दुपारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात सांगण्यात आले आहे.

BJP leader LK Advani
LK Advanis Bharat Ratna : लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान

अडवाणी यांचा 'भारतरत्न' देऊन सन्मान

८ नोव्हेंबर १९२७ रोजी पाकिस्तानातील कराची येथे एका हिंदू सिंधी कुटुंबात जन्मलेल्या अडवाणी यांना या वर्षी भारत सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित केले. २०१५ मध्ये त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. ते १९९८ ते २००४ दरम्यान भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये गृहमंत्री होते. लालकृष्ण अडवाणी यांनी २००२ ते २००४ दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये भारताचे सातवे उपपंतप्रधानपद भूषवले होते. १० व्या आणि १४ व्या लोकसभेच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news