Jaat Movie 2 | अ‍ॅक्शनचा डोस दुप्पट! ‘जाट 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मायथ्री मूव्ही मेकर्सने ‘जाट २’ ची अधिकृत घोषणा करत चाहत्यांना गुड न्यूज झलक दिली आहे.
Jaat Movie 2
जाट चित्रपटाच्या यशानंतर जाट २ येतोय x account
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - सुपरहिट अ‍ॅक्शन ड्रामा ‘जाट’ने प्रेक्षकांवर भूरळ घातलीय. बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असतानाच जाटने सिनेरसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केलंय. साहस, अ‍ॅक्शन, आणि दमदार कलाकारांच्या अभिनयाने तसेच शानदार कहाणी या सगळ्यांमुळेच ‘जाट’ ब्लॉकबस्टर बनला आहे. आता, या यशानंतर मायथ्री मूव्ही मेकर्सने ‘जाट २’ ची अधिकृत घोषणा करत चाहत्यांना गुड न्यूज झलक दिली आहे.

मायथ्री मूव्ही मेकर्सने सोशल मीडियावर एक दमदार पोस्टर शेअर करत 'जाट २' येत असल्याची माहिती दिली. एक्स अकाऊंटवरही #Jaat2 या हॅशटॅगसह ट्रेंड करत आहे.

माइथ्री मूवी मेकर्सने एक्सवर जाट सीक्वलची माहिती देत एक पोस्टर जारी केलं आहे, त्यावर बोल्ड अक्षरात जाट २ लिहिलेलं दिसत आहे. सनी देओलचे नावही बोल्ड अक्षरात लिहिलेलं दिसत आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होतं की, 'जाट' सीक्वलमध्ये सनी देओल मुख्य भूमिकेत दिसेल. अद्याप ‘जाट २’ मध्ये अन्य कोणते कलाकार असतील, हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र, अशी चर्चा आहे की ‘जाट’मध्ये एक नवीन अभिनेत्री किंवा नवीन खलनायक दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करणार, याची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.

‘जाट २’ चं शूटिंग कधी सुरू होणार, ट्रेलर कधी येणार आणि तो कोणत्या दिवशी प्रदर्शित होईल – या सर्व गोष्टींबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचे संकेत मायथ्री मूव्ही मेकर्सने दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news