

पुढारी ऑनलाईन
अनन्या पांडे तिच्या चित्रपटांसह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. सध्या ती अभिनेता ईशान खट्टरला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. दोघे एकत्र सुट्टीवर जातात, डिनर, लंचला भेटत असतात. आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसून आली आहे आणि त्यांचे फोटोज, व्हिडिओजही व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे, हे दोघे यावेळी चक्क ईशानचा सावत्र भाऊ शाहिद कपूरच्या घरात होते आणि तिथून बाहेर पडताना अनन्याला पॅपराझींनी कॅमेर्यात कैद केले. फोटोग्राफर्सना पाहून अनन्या हैराण झालेली दिसली. दरम्यान, ईशान आणि अनन्या ही जोडी 'खाली पिली' चित्रपटात एकत्र दिसली होती. तेव्हापासूनच त्यांच्या अफेयरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अनन्याचा 'गहराईयाँ' हा चित्रपट येत्या 11 तारखेला ओटीटीवर रीलीज होत आहे.