The Royals | शाही गोंधळात प्रेमाचं फुलणं – ‘द रॉयल्स’ने नेटफ्लिक्सवर माजवली धूम!

ईशान खट्टर-भूमी पेडनेकर रोमान्स करताना दिसणार आहेत. 'द रॉयल्स' रिलीजची घोषणा करण्यात आली आहे.
The Royals -ishaan khatter Bhumi Pednekar
ईशान खट्टर आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘द रॉयल्स’ची रिलीज डेट घोषित करण्यात आलीयInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - ईशान खट्टर - भूमी पेडणेकर यांच्या 'द रॉयल्स' चित्रपटाच्या रिलीजची घोषणा करण्यात आलीय. बॉलीवूडमधील दोन दमदार कलाकार – ईशान खट्टर आणि भूमी पेडणेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे ‘द रॉयल्स’, आणि या चित्रपटाची अधिकृत रिलीज तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट ९ मे २०२५ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

ईशान खट्टर आणि भूमी पेडणेकर प्रथमच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. या सीरीजची कथा एका मोरपूर पॅलेस या राजवाड्यावर आधारित आहे. ‘द रॉयल्स’ ही एक आधुनिक काळातील प्रेमकथा असून, पारंपरिक राजघराण्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटात ईशान खट्टर एका राजघराण्यातील राजकुमाराच्या भूमिकेत दिसणार आहे, तर भूमी पेडणेकर एक सामान्य, पण आत्मविश्वासू मुलीच्या भूमिकेत झळकणार आहे. राजघराण्याचे दिवस फारसे चांगले नसतात आणि त्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं असतं. अशा वेळी येते ती एक दृढनिश्चयी सीईओ सोफिया शेखर.

नेटफ्लिक्सने नुकताच या सीरीजचे एक खास पोस्टर आणि टीझर शेअर केले आहे, ज्यामध्ये ईशान आणि भूमी रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करताना नेटफ्लिक्सने कॅप्शनमध्ये लिहिलंय- 'A ziddi rajkumar meets a girlboss aamkumari 👀 Royal mess, ya shahi love story? 💕👑 Watch The Royals, a new Netflix series out 9 May, only on Netflix.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news