

पुढारी ऑनलाईन डेस्क - प्रसिद्ध इन्फ्लुएंसर इंशा घई कालराचे पती अंकित कालराचे निधन झाले आहे. अंकित कालराचे निधन १९ ऑगस्ट, २०२४ रोजी झाले होते. अंकित आणि इंशाने फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न केले होते. अंकित २९ वर्षांचा होता, असे समजते.
सोशल मीडियाच्या जगातील एक प्रमुख नाव असलेल्या अंकित कालराचे निधन झाले. तर त्याची पत्नी इंशा हीदेखील एक प्रसिद्ध इन्फ्लुएंसर होती. अंकित कालरा इन्स्टाग्रामवर आपल्या मजेशीर कपल रील्ससाठी प्रसिद्ध होते. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ आणि पोस्ट्सने लाखों लोकांची मने जिंकली. अंकित कालराच्या अचानक मृत्यूने त्याचा परिवार, मित्र लाखों प्रशंसकांना धक्का बसला आहे. अंकित - इंशाने फेब्रुवारी २०२३ मध्ये लग्न झाले होते.
अंकित कालराच्या निधनाचे वृत्त समोर येताच सोशल मीडियावर श्रद्धाजली वाहण्यात येऊ लागली. २० ऑगस्ट, २०२४ रोजी इंशा घईने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर पती अंकितचा एक फोटो शेअर केला आहे. इंशाने लिहिलं, ''अंकित कालराच्या आठवणीत. 24-3-1995...19-4-2024.''
इंशाने आपल्या पोस्टमध्ये पतीच्या मृत्यूचे कारण सांगितलेले नाही.
इंशा आणि अंकितच्या लग्नाला केवळ दिड वर्ष झाले होते. पतीच्या मृत्यूनंतर इंशाने एक भावूक नोटदेखील लिहिलीय. तिने लिहिलंय, "मला एक दिवस घेऊन चल. परत ये... प्लीज? मला तुझी खूप आठवण येते." इंशा घईच्या करिअर विषयी बोलायचे झाले तर ती एक डिजिटल क्रिएटर आहे. ती एक डिझायनर देखील आहे.