India's Got Latent | ‘कुणीतरी हिला स्क्रिप्ट आणून द्या’ समय रैनाच्या शोमध्ये ‘ट्रम्प’ यांच्याकडून आलिया झाली चांगलीच रोस्ट!

इंडीयाज गॉट लेन्टेन्ट या शोमध्ये आलिया - शर्वरीची हजेरी, अल्फा चित्रपटाचे प्रमोशन,
India's Got Latent
India's Got Latent
Published on
Updated on

India's Got Latent समय रैना याच्या शोमध्ये गेल्यावर्षी झालेल्या विविध कॉन्ट्रावर्सीमुळे हा शो बंद होतो. आता पुन्हा इंडीया इंडियाज गॉट लेटेंट (India's Got Latent) हा शो नेटफ्लिक्स वर रिलीज झाला आहे. यामध्ये अल्फा या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया भट व शर्वरी वाघ या दोघींनी हजेरी लावली होती.

कहां कान्स कहां लेटेंट

या शोमध्ये समय रैना हा आलियाची चांगलीच खेचताना दिसत आहे. स्वागत करतानाच समय रैना म्हणतो की आलिया तुझ्या फिल्मनी हजारो कोटीचा व्यवसाय केला आहे. तू कान्सच्या रेड कार्पेटवर चालतेस. ते एका बाजूला आणि थेट इंडीयाज गॉट लेटेंट च्या मंचावर कसे वाटते, असे म्हणून आलियाला प्रश्न विचारतो. तर या शोमध्ये मात्र कॅमेऱ्याचा तुझ्यावरच फोकस राहील असे म्हणून तिची चांगलीच खेचतो.

आलियाचे भन्नाट उत्तर

यावर आलिया भट्टने दिलेल उत्तर भन्नाट होते ती म्हणते मी आज येथे आले आणि आम्ही सर्वजण खूप हसलो यासाठी कपिल शर्मा याचे खूप आभार, या शोमध्ये येऊन ती कपिलच्या शोची तारिफ करते

कोणितरी स्क्रिप्ट आणून द्या व तिच्या दिग्दर्शकाला बोलवा

या शोमध्ये एक स्पर्धक डॉनाल्ड ट्रम्प यांचां गेटअप करुन त्‍यांची मिमिक्री करत आहे. या स्पर्धकांने टाळ्या शिट्टया घेतल्या, या स्पर्धकाला आलियाला एक प्रश्न विचारायचा असतो. आलिया माईक हातात घेते पण ती बोलताना अडखळते, खपू वेळ तिच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नाही. समयसूचकता दाखवत तो स्पर्धक म्हणतो ‘ तिला कोणीतरी स्क्रिप्ट आणून द्या व तिच्या डायरेक्टरला बोलवा’ या जोकवर प्रेक्षकांमध्ये हास्याची लकेर उमटते. समय रैना या जोकवर खूष होऊन स्पर्धकावर पार्टी पॉपर फोडतो

स्टंट डायरेक्टरलाही बोलवा

पुढच्या काही वेळात याच स्पर्धकाचा जोक आलियाला खूप आवडतो. त्‍यामुळे ती खूष होऊन पार्टी पॉपर फोडण्याचा प्रयत्‍न करते. पण खपू वेळ प्रयत्‍न करुनही. हा पेपर क्रॅकर तिच्याकडून फूटत नाही. यावर परत हा स्पर्धक डोनाल्ड ट्रम्पच्या आवाजात जोक मारतो की कोणीतरी स्टंट डायरेक्टरला बोलवा. यावर आलिया शर्वरीसह सर्वजण चांगलेच हसतात.

शर्वरीचेही फनी काँमेंट

या शो मध्य शर्वरही वाघही हजर होती. यावेळी समय रैना तिची ओळख करुन देताना चांगलीच खेचतो. ‘शर्वरी तुम कौन हो बताओ, यंहा पे तो आलिया प्लस वन एैसा लिखा है’ असे म्हणतो, तसचे हा शो तुला माहिती आहे का असे म्हणतो. यावर शर्वरी म्हणते की मी चांगलेच या शोला ओळखतो गेल्यावर्षी मी खूप वेळा या शोच्या क्लिप व तुझ्या क्लिप्स पाहिल्या आहेत न्युज मध्ये. यातून ती समयच्या कॉन्ट्रावर्सीची आठवण त्‍याला करुन देते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news