

पुढारी ऑनलाईन डेस्क - बीयर बाइसेप्स नावाने प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. 'इंडिया गॉट लेटेंट' शो दरम्यान, दिलेल्या आक्षेपार्ह विधानांविरोधात त्याच्यावर विविध राज्यामध्ये FIR दाखल करण्यात आलीय. आता आक्षेपार्ह आरोपांवर दाखल झालेल्या FIR विरोधात रणवीर अलाहाबादियाने कोर्टाची पायरी चढलीय.
रणवीर अलाहबादिया कॉमेडी शो इंडियाज गॉट लॅटेंटमध्ये गेस्ट म्हणून पोहोचला होता. तिथे त्याने एका कंटेस्टेंटशी पालकाबद्दल अश्लील प्रश्न विचारला. बघता बघता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. यावरून रणवीरवर लोक खूप भडकले.
प्रचंड टीकेनंतर रणवीरने व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली. तो म्हणाला- ''माझी कॉमेंट न केवळ चुकीची होती तर ती अजिबात विनोदी नव्हती. मी इथे माफी मागायला आलो आहे. माझा निर्णय चुकीचा होता, असे करणे कूल नव्हते. पॉडकास्ट प्रत्येक वयातील लोक पाहतात. मी असा व्यक्ती बनू इच्छित नाही, जो ती जबाबदारी खूप हलक्यामध्ये घेतो. या संपूर्ण अनुभवातून माझी शिकवण हिच असेल की, मी या प्लॅटफॉर्मला उत्तम पद्धतीने चालवेन. मी वचन देतो की, मी उत्तम व्यक्ती बनेन. मी व्हिडिओ मेकर्सना सांगितले आहे की, त्यातील असंवेदनशील हिस्सा हटवावा. अखेरीस मी हे सांगू इच्छितो की, मला दु:ख आहे. मी अपेक्षा करतो की, एक माणूस म्हणून तुम्ही मला माफ कराल.''
'इंडियाज गॉट लॅटेंट' प्रकरणी टीका जाल्यानंतर रणवीर अलाहबादियाला 'ड्रामा क्वीन' राखी सावंतचे समर्थन मिळाले होते. 'बीयर बाइसेप्स' नावाने प्रसिद्ध पॉडकास्टर रणवीरला अश्लिल विधानामुळे प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलंय. मोठा गोंधळ उडाल्यानंतर तो एपिसोड यूट्यूबवरून हटवण्यात आला. सोबतच या एपिसोडच्या टीममध्ये उपस्थित असणाऱ्यांवरोधातही एफआयआर दाखल करण्यात आले. दरम्यान, रणवीरने व्हिडिओ पोस्ट करून माफी देखील मागितली. यावेळी राखी सावंतने रणवीरच्या माफी मागणाऱ्या व्हिडिओ पोस्टमध्ये कॉमेंट सेक्शनमध्ये आपली प्रतिक्रिया दिलीय. रणवीर अल्लाहबादियाच्या शोमध्ये याआधी राखी सावंतने हजेरी लावली होती. तिने सर्वांना रणवीरला माफ करण्याची विनंती केली. राखीने कॉमेंट केली की, 'उसे माफ कर दो यार. अगर ऐसा हो गया तो ठीक है. कभी-कभी उसे माफ कर दो. मुझे पता है कि उसने गलत किया, लेकिन उसे माफ कर दो.'
viral bhayani Instagram post